28 C
Mumbai
Sunday, September 22, 2024
Homeटॉप न्यूजधक्कादायक: दोन सौंदर्यवतींचा भीषण कार अपघात जागीच मृत्यू

धक्कादायक: दोन सौंदर्यवतींचा भीषण कार अपघात जागीच मृत्यू

टीम लय भारी

 तिरुअनंतपुरम : ‘मिस केरळ 2019’ या सौंदर्य स्पर्धेची विजेती अॅन्सी कबीर (Ancy Kabeer) आणि उपविजेती अंजना शाजन यांचा (Anjana Shajan) यांचा अपघाती मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. 31 ऑक्टोबरच्या मध्यरात्री व्हिटिला-पलारीवट्टम महामार्गाच्या बायपासवर झालेल्या कार अपघातात दोघींनाही जागीच प्राण गमवावे लागले(Miss Kerala 2019 Beauty Contestant Passes Away in Accident)

या घटनेमुळे सौंदर्यवतींच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून चाहतेही शोकाकुल अवस्थेत आहेत. अपघातात झालेल्या कारच्या चुराड्याची भीषण दृश्यं समोर आली आहेत.

मुंबई पोलिसांनी घेतली सचिन वाझेची कस्टडी

पवारांच्या जावयांकडे इतके पैसे कसे ? किरीट सोमय्यांचा सवाल

कसा झाला अपघात

केरळ जिल्ह्यातील चक्करापरंबू येथील हॉलिडे इनजवळ एका दुचाकीला धडक दिल्यानंतर अॅन्सी आणि अंजना प्रवास करत असलेल्या कारचे नियंत्रण सुटले. त्यानंतर कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळून पलटी झाली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

दोघांची प्रकृती गंभीर

पलारीवट्टोम येथील ईएमसी हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या कारमधील अन्य एकाची प्रकृती चिंताजनक आहे, तर दुसऱ्याची प्रकृती स्थिर आहे. पालरीवट्टम पोलिसांनी सांगितले की, ज्या दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात कारला अपघात झाला, तो जखमी अवस्थेत घटनास्थळावरुन पळून गेला.

दिवाळीनंतरच्या धमाक्यासाठी “है तैयार हम”, फडणवीसांच्या इशाऱ्यावर नवाब मलिकांचे प्रत्युत्तर

Former Miss Kerala Ansi Kabeer, runner-up Anjana Shajan killed in car crash in Kochi

मॉडेलिंग फोटो शूट

दोन्ही सौंदर्यवतींचे मृतदेह त्याच रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत. 24 वर्षीय अॅन्सी कबीर थिरुवनंतपुरम, तर 25 वर्षीय अंजना शाजन ही त्रिशूर येथील रहिवासी होती. दोघी आपल्या मूळ गावांमधून मॉडेलिंग फोटो शूटसाठी कोची येथे आल्या होत्या. 2019 या वर्षी ‘मिस केरळ’ या सौंदर्य स्पर्धेत अॅन्सी कबीर विजेती, तर अंजना शाजन उपविजेती ठरली होती.

थ्रिसूरला जात असताना चक्करापरंबू जंक्शन या अपघात प्रवण भागात बाईकस्वाराला वाचवण्याच्या त्यांच्या कारला भीषण अपघात झाला. धडकेनंतर कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. या अपघातातील एक प्रवासी गंभीर जखमी असून अन्य एकाची प्रकृती स्थिर आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी