28 C
Mumbai
Saturday, July 6, 2024
Homeटॉप न्यूजनाना पटोलेंचा भाजपवर निशाणा, ज्वलंत प्रश्नावरून दुसरीकडे लक्ष वळविण्यासाठी वझेंचा मुद्दा

नाना पटोलेंचा भाजपवर निशाणा, ज्वलंत प्रश्नावरून दुसरीकडे लक्ष वळविण्यासाठी वझेंचा मुद्दा

टीम लय भारी

मुंबई : केंद्र सरकारने केलेली अन्यायकारक इंधनदरवाढ, त्यामुळे वाढलेली महागाई, अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण, फडणवीस सरकारच्या काळातला महाऑनलाईन घोटाळा, मराठा आरक्षण प्रकरणातील केंद्र सरकारची संदिग्ध भूमिका, प्रभू श्रीरामाच्या नावाने सुरु असलेली लूट, अशा मुद्द्यांना बगल देऊन जनतेची दिशाभूल करण्याचा भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न असून त्यासाठीच विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सचिन वाझेंचा मुद्दा उपस्थित करून गोंधळ घातला जात आहे. मनसुख हिरेन प्रकरणात जे दोषी असतील त्यांची चौकशी करून त्यांना शिक्षा करण्यात सरकार मागेपुढे पाहणार नाही, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात बोलताना पटोले म्हणाले की, मनसुख हिरेन आत्महत्या प्रकरणात सचिन वाझे हे चौकशी अधिकारी नाहीत. या प्रकरणाचा तपास ATS कडे आहे, त्याच्याशी वाझेंचा काहीही संबंध नाही. असे असतानाही विरोधी पक्ष नेते जाणीवपूर्वक वाझेंचा मुद्दा उपस्थित करत आहेत. मुद्दामहून वाझेंचे नाव घेऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न विरोधी पक्ष नेत्यांकडून सुरु आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कॉल डिटेल्स रेकॉर्ड कसे मिळाले? त्यांना ते मिळवण्याचा अधिकार आहे का? असा प्रश्न उपस्थित करून मुकेश अंबानी यांची अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्था आहे. तीन स्तरीय सुरक्षा व्यवस्था असताना अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके असलेली गाडी कशी काय जाऊ शकते, असेही पटोले म्हणाले.

तत्पूर्वी त्यांनी विधान परिषदेत मराठा आरक्षणाच्या सद्यस्थितीबाबत निवेदन केले. या निवेदनात त्यांनी सोमवारी केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात मांडलेली भूमिका, राज्य सरकारने केलेली विनंती व सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आदेश यासंदर्भात माहिती दिली.

फडणवीस सरकारच्या काळात महाघोटाळा : नाना पटोले यांचा आरोप

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी