28 C
Mumbai
Sunday, September 22, 2024
Homeटॉप न्यूज'निर्भया पथक' मदतीसाठी 'सक्षम'

‘निर्भया पथक’ मदतीसाठी ‘सक्षम’

टीम लय भारी

मुंबई : महाराष्ट्रात सतत होणाऱ्या बलात्काराच्या प्रकारांनंतर प्रशासनाने ‘निर्भया पथक’ तसेच ‘सक्षम’ या दोन पथकांची स्थापना केली आहे. त्याचबरोबर महिलांची सुरक्षा आणि संरक्षण वाढवण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्तांनी नवीन नियमावली जाहीर केली आहे (Nirbhaya Pathak andsaksham to help women).

महिलांना सहन करावे लागणारे अत्याचार आणि नेहेमीची होत असलेली छेडछाड या प्रकरणाला काही प्रमाणात आळा घालण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्तांच्या वतीने निर्भया पथकाची स्थापना केली आहे. त्याच बरोबर मुंबई पोलीस दला मार्फत M POWER या संस्थेच्या सहभागातून ‘सक्षम’ उपक्रम राबवण्यात येणार आहे. पीडित महिला, पोस्को कायद्यांतर्गत गुन्ह्यातील पीडित, अल्पवयीन मुला-मुलींच्या मानसिक सक्षमीकरणासाठी समुपदेशनाच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे.

नौशाद शिकलगार यांची राष्ट्रवादीच्या अल्पसंख्यांक विभागाच्या उपाध्यक्षपदी निवड

निजामविरोधी लढ्यातील योद्धयांना स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान द्यावा, मराठवाडा मुक्ती संग्राम स्मारक समितीने केली मागणी

निर्भया पथक व सक्षम उपक्रमांतर्गत प्रत्येक पोलीस ठाण्यात वुमेन सेफ्टी सेल स्थापन केला जाणार आहे. तसेच मुंबईतील प्रत्येक पोलीस ठाण्यातील ‘मोबाइल-५’ गस्त वाहनास ‘निर्भया पथक’ असे संबोधण्यात येणार आहे. याविषयी निर्णय घेण्यासाठी गृह विभागाची आढावा बैठक आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या उपस्थितीत झाली. पोलिस महासंचालक कार्यालयात झालेल्या या बैठकीस राज्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे उपस्थित होते.

अत्याचाराच्या गंभीर प्रकरणात दोषारोपपत्र लवकरात लवकर दाखल करावे. अशा न्यायालयीन प्रकरणांना गती देण्यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करावा. महाराष्ट्र पोलिस दल नावारूपाला आलेले दल आहे. हे नाव राखण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे. शक्ती कायद्याचे प्रारूप विधानसभेत मांडण्यात आले आहे. कायदा परिपूर्ण होण्यासाठी विधिमंडळाची संयुक्त समिती गठित करण्यात आलेली असून या समितीचा अहवाल आगामी हिवाळी अधिवेशनात सादर करणार असल्याचेही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आपल्या ट्विटर वरून सांगितले.

आमदार रोहित पवारांनी निर्मला सितारामण यांची घेतली भेट

Mumbai Police stations to have Nirbhay.a Squads to curb crimes against women Read more At: 

यासोबतच नियमावलीचे परिपत्रक जोडले आहे.

Nirbhaya
‘निर्भया पथक’ मदतीसाठी ‘सक्षम’

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी