31 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeटॉप न्यूजनितेश राणेंच्या स्वीय सहाय्यकाला चार दिवसांची पोलिस कोठडी

नितेश राणेंच्या स्वीय सहाय्यकाला चार दिवसांची पोलिस कोठडी

टीम लय भारी

सिंधुदुर्ग : शिवसेना कार्यकर्ते संतोष परब हल्ल्यातील संशयित आरोपी भाजप आमदार नितेश राणेंच्या स्वीय सहाय्यक राकेश परब यांस न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. राकेश परब हे सोमवारी स्वतःहून कणकवली पोलिस ठाण्यात हजर झाले होते(Nitesh Rane’s personal assistant remanded in police custody). 

दरम्यान या प्रकरणामुळे आमदार नितेश राणे हे अडचणीत सापडले आहे. या प्रकरणी संशयित असलेल्या नितेश राणे यांच्या नियमित जामीन अर्जावर सोमवारी युक्तिवाद पूर्ण झाला आहे. या प्रकरणावर आज कोर्ट निर्णय देणार आहे. आज दुपारी 3 वाजता हा निर्णय दिला जाईल(Arguments on Nitesh Rane’s regular bail application were completed on Monday).

परब याची तब्बल आठ तास पोलीसांनी चौकशी केली. त्यानंतर सायंकाळी राकेश परब यांस कणकवली पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी आज सकाळी त्यांना कोर्टासमोर हजर केले होते. यानंतर त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनवाण्यात आली आहे. सरकारी पक्षातर्फे 14 दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली होती.मात्र न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावलेली आहे.

हे सुद्धा वाचा 

सर्वोच्च न्यायालयाचा नितेश राणेंना दणका

नितेश राणेंच्या अडचणीत वाढ, जिल्हा सत्र न्यायालयात आज पुन्हा सुनावणी

सिंधुदुर्ग किल्ला महाराजांनी बांधला, कोण तरी बोलेलं मी बांधला, मुख्यमंत्र्यांचा नारायण राणेंवर पलटवार

SC asks MLA Nitesh Rane to surrender and seek bail, protects him from arrest for 10 days

नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज अंतिम सुनावणी होणार आहे. आज दुपारी तीन वाजता सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालय आपला अंतिम निकाल सुनावणार आहेत. त्यामुळे नितेश यांना दिलासा मिळतो की, जेलमध्ये जावे लागते. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सुप्रीम कोर्टाने नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. तसेच 10 दिवसात न्यायालयासमोर शरण येण्यास सांगितले होते. त्यानुसार सोमवारी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी पार पडल्यानंतर कोर्टाने मंगळवारी दुपारी तीन वाजता अंतिम फैसला सुनावणार असल्याचे म्हटले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी