29 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeटॉप न्यूजअर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांकडून कृषी क्षेत्रासाठी महत्त्वाच्या घोषणा

अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांकडून कृषी क्षेत्रासाठी महत्त्वाच्या घोषणा

टीम लय भारी
 
नवी दिल्ली:- येत्या वर्षात देशाचा विकास दर 9.27% असेल, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले. 2022 चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना कृषी क्षेत्रासाठीही महत्त्वाच्या घोषणा केल्या. त्यात त्यांनी 2023 हे भरडधान्याचे वर्ष म्हणून घोषित करून रसायनमुक्त नैसर्गिक शेतीला चालना दिली जाईल, असे अर्थमंत्र्यांनी सांगितले. शासनाकडून शेतकऱ्यांना डिजिटल सेवा देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.(Important announcements agricultural sector  Finance Minister)

सेंद्रिय शेतीवर शासनाचा भर असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर तेलबियांच्या उत्पादनाला चालना देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असं अर्थमंत्र्यांनी सांगितलं. तसेच जलसिंचन वाढवण्याचा प्रयत्न, सौर उर्जेचा वापर, पेयजलासाठी जवळपास 1400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे निर्मला सीतारामन यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

अर्थमंत्री निर्मला सीतारमण मांडणार देशाच्या आर्थिक विकासाचे अर्थसंकल्प

अर्थमंत्र्यांकडून आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर, आर्थिक सर्वेक्षणात पुढील वर्षीच्या वाढीचा अंदाज 8.0-8.5% असेल

अमित शहांचा अखिलेश यादव यांच्यावर घणाघात

Budget: No Income Tax Change, Big Jump In Capex – 10 Points

तसेच, केंद्र सरकारकडून गहू आणि धानाची विक्रमी खरेदी केली जाणार आहे. किमान आधारभूत किमतीद्वारे विक्रमी खरेदी केली जाणर आहे. गंगा नदीच्या पाच किलोमीटर परिसरातील शेतकऱ्यांसाठी विशेष योजना राबविली जाईल.

गंगा कॉरिडॉरच्या आसपास नैसर्गिक शेतीला चालना दिली जाईल. याशिवाय, गोदावरी कृष्णा, कृष्णा पेन्नार, पेन्नार कावेरी नद्यांसाठी योजना राबवण्यात येईल, असे निर्मला सितारामन यांनी सांगितले. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना सांगितले की, येत्या वर्षात देशाचा विकास दर 9.27 टक्के राहण्याची अपेक्षा आहे. विकासाच्या चार स्तंभांवर लक्ष केंद्रित करून – समावेशक विकास, उत्पादकता वाढ, ऊर्जा संक्रमण आणि हवामान कृती – या अर्थसंकल्पात भारताच्या 75 व्या क्रमांकावरून 100 व्या क्रमांकावर असलेल्या भारताच्या अर्थव्यवस्थेची ब्लू प्रिंट देण्यात आली आहे, असे सीतारामन यांनी सांगितले.

मेड इन इंडिया टॅबलेटने सलग दुसऱ्या वर्षी पारंपारिक ‘बही खाता’ची जागा घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आदींसोबत झालेल्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्रिमंडळाने अर्थसंकल्पाला मंजुरी दिली

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी