28 C
Mumbai
Sunday, September 22, 2024
Homeटॉप न्यूजअरे व्वा! Laybhari!! वर्षाला ६ सिलेंडर मोफत, सरकारी नोकरी, कर्ज माफ, पेन्शन...

अरे व्वा! Laybhari!! वर्षाला ६ सिलेंडर मोफत, सरकारी नोकरी, कर्ज माफ, पेन्शन २ हजार आणि मोफत इंटरनेट

टीम लय भारी

तामिळनाडू : तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी अण्णाद्रमुकने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यातून (Manifesto) मतदारांवर आश्वासनांचा पाऊसच पाडण्यात आला आहे. प्रत्येक कुटुंबाला वर्षाला ६ सिलेंडर मोफत, कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी, विद्यार्थ्यांचे कर्ज माफ, ज्येष्ठ नागरिकांना २ हजार रुपये पेन्शन आणि मोफत इंटरनेट डाटा देण्यात येईल, असे या जाहीरनाम्यात (Manifesto) म्हटले आहे.

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता चांगलाच रंगू लागला आहे. निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावांची घोषणा राजकीय पक्षांकडून करण्याबरोबरच जाहीरनामेही प्रसिद्ध केले जाऊ लागले आहेत. तामिळनाडूत सध्या सत्तेवर असलेल्या अण्णाद्रमुकने जाहीरनामा प्रसिद्ध करताना अनेक आश्वासने मतदारांना दिली आहेत.

पुन्हा सत्तेत आल्यास राज्यातील प्रत्येक कुटुंबाला एका वर्षात ६ सिलेंडर मोफत देण्यात येईल. त्याचबरोबर कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी दिली जाईल, असे आश्वासन जाहीरनाम्यात देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी घेतलेले शैक्षणिक कर्ज माफ करण्याचे आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना टूजी डाटा मोफत देण्याचे वचनही अण्णाद्रमकने दिले आहे. मध्यान्ह भोजन आहार नववी, दहावी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना सुरू करण्याचाही समावेश जाहीरनाम्यात करण्यात आलेला आहे.

वृद्धांना देण्यात येणाऱ्या पेन्शनमध्ये दुप्पट वाढ करण्याचे आश्वासन अण्णाद्रमुकने दिले आहे. सध्या ज्येष्ठ नागरिकांना १ हजार रुपये पेन्शन मिळते. ती २ हजार करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. याचबरोबर मद्रास उच्च न्यायालयाचं तामिळनाडू उच्च न्यायालय असं नामांतर करण्याची आणि श्रीलंकन निर्वासितांना दुहेरी नागरिकत्व आणि राहण्याचा परवाना देण्याचाही जाहीरनाम्यात समावेश करण्यात आलेला आहे. सुधारित नागरिकत्व कायद्याबद्दल पुनर्विचार करण्यासाठी केंद्राला विनंती करेल, असेही अण्णाद्रमुकने जाहीरनाम्यात म्हटले आहे.

जाहीरनाम्यात आणखी एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. मातृत्व रजा वाढवून एक वर्ष करण्याचे आश्वासन देण्यात आले असून, अम्मा बॅंकिंग कार्ड, शहरात अण्णा पेट्रोल वाहन, रिक्षा चालकांसाठी एमजीआर ऑटो योजनेतंर्गत अनुदान देण्याची घोषणा अण्णाद्रमुकने जाहीरनाम्यातून केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी