27 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeटॉप न्यूजभटक्या विमुक्त कंत्राटदाराचे बिल थकवले, सार्वजनिक बांधकाम विभागाविरोधात कंत्राटदाराचे उपोषण

भटक्या विमुक्त कंत्राटदाराचे बिल थकवले, सार्वजनिक बांधकाम विभागाविरोधात कंत्राटदाराचे उपोषण

टीम लय भारी

मुंबई : भटक्या विमुक्त समाजातील कंत्राटदार राजू चनाप्पा हुलगुंडे यांचे रस्ता डांबरीकरण करून घेतलेले बिल अद्याप सार्वजनिक बांधकाम विभागाने अदा न केल्यामुळे या कंत्राटदारावर व त्याच्या कुटुंबीयांवर उपासमारीची पाळी आली असून याविरोधात त्यांचे आझाद मैदानात उपोषण सुरू आहे(PWD exhausted VJNT Contractor’s bill).

हिंगोली येथील रहिवाशी असलेले कंत्राटदार राजू चनाप्पा हुलगुंडे यांनी परभणी येथील मौजे ताडकळस ते धानोत काळे पालम रोड या रोडचे डांबरीकरण केले होते या कामासाठी लागणारी रक्कम अद्याप देण्यात आलेली नाही. संबंधित बांधकाम उपअभियंता आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बिला संदर्भात चौकशी केल्यास रक्कम देण्यासाठी टाळाटाळ करीत आहेत.

पदरचे लाखो रुपये खर्च करून वरील रस्ता दुरुस्त करून आम्ही डांबरीकरण केलेले आहे, नियमाप्रमाणे संबंधित अभियंत्यांनी माझे बिल काढावे, आणि योग्य ती रक्कम मला आता करावी अशी मागणी राजू चनाप्पा हुलगुंडे यांनी केली आहे.

हे सुद्धा वाचा

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या कर्ज वाटपामध्ये कोट्यावधीचा भ्रष्टाचार

अनुसूचित जातींच्या शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ

Maharashtra govt urges SC to recall its order to re-notify OBC reservation in local body polls

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी