33 C
Mumbai
Sunday, May 12, 2024
Homeटॉप न्यूजमाजी IAS किशोर गजभिये म्हणाले, सेवाभावी वृत्तीने काम केलेला माणूस मोठा होता

माजी IAS किशोर गजभिये म्हणाले, सेवाभावी वृत्तीने काम केलेला माणूस मोठा होता

टीम लय भारी

मांडवा : मांडवा येथील महामाया देवी विद्यालय येथे आयोजित संजीवनी शिक्षण संस्था मंडळाचे अध्यक्ष रामदासजी गजभिये यांचा 80 वा वाढदिवस अभिष्टचिंतन व नागरी सत्कार आणि कार्यक्रमात आयोजित केले होते(Ramdas Gajbhiye’s 80th birthday, Organize various programs).

माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये यांनी निस्पृह व सेवाभावी वृत्तीने कर्तुत्व केल्यास माणूस मोठा होतो असे वक्तव्य करून किशोर गजभिये यांचे अभिनंदन केले. अध्यक्षस्थानी नालंदा शिक्षण संस्था संचालक शैलेश मयूर होते. आमदार राजू पारवे या कार्यक्रमात रामदास गजभिये यांचे सामाजिक कर्तव्य तसेच त्यांच्या जीवन संदर्भात माहिती दिली आहे. संजीवन शिक्षण संस्था मंडळाचे अध्यक्ष रामदास जी गजभिये यांनी आपल्या जीवनात खडतर प्रवास केला.

राजू पारवे म्हणाले, रामदास गजभिये यांनी अनेक सामाजिक राजकीय कार्यात त्यांनी आपला ठसा उमटवला. प्रथम मांडली येथे वसतिगृहांची स्थापना करीत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी उपक्रम उपलब्ध केरून दिले . त्यानंतर महामाया देवी विद्यालयाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी घडविण्यात त्यांचा हातभार आहे. तसेच गौतम बुद्ध व बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्राचा प्रथम प्रभाव त्यांच्यावर असून त्यांची शिकवण व आदर्श मानून हे कार्य करत असतात. त्यांचे विचार हे समाजाला प्रेरणादायी आहेत.

हे सुद्धा वाचा

मंत्री ‘कोरोना’तून बरे झाले, अन् लेकीला झाला आनंद!

डॉ. आंबेडकर पीपल्स युनिव्हर्सिटी उभारण्याकरिता आठवले, गायकवाड, आनंदराज, थोरात, मुणगेकरांना साद

NCW red flags Mahesh Manjrekar’s Marathi film, says censor trailer and movie

यावेळी सामाजिक न्याय विभाग उपयुक्त सिद्धार्थ गायकवाड यांनी रामदासजी गजभिये यांच्या जीवनावर तयार केलेली डॉक्युमेंटरी प्रदर्शित केली. शालेय विद्यार्थ्यांची संस्कृती कार्यक्रम सादर करण्यात आले याप्रसंगी उपस्थितानी त्यांचे चिंतन करीत अनेकांनी त्यांचा सत्कार केला. तसेच सरपंच बापूराव मोटघरे प्राजक्त चौधरी नीता भोयर गौतम शेडगे यांचा देखील नागरी सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक विनय गजभिये यांनी केले.संचालन हंसदाम मेश्राम यांनी तर आभार गजभिये याचे मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शालेय शिक्षक व शिक्षिका व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.

यावेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमात अनेक भंते मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मांडळ येथील वसतिगृहात राहून पुढे उच्च शिक्षण झालेले सामाजिक न्याय विभाग नागपूरचे उपयुक्त सिद्धार्थ गायकवाड पार्टी, पुण्याचे महासंचालक धम्म ज्योती गजभिये, पोस्ट ऑफिस महाराष्ट्र राज्य गजभिये प्रेमदास गजभिये, तहसीलदार अंबादे ईश्वर महाराज, सुखदेव उरकुडे महाराज, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मनोज तितरमारे, संदीप खानोरकर आदी मंचावर उपस्थित होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी