31 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeटॉप न्यूजदाऊद इब्राहिमला भारतात आणा, रोहित पवारांची पंतप्रधानांकडे मागणी

दाऊद इब्राहिमला भारतात आणा, रोहित पवारांची पंतप्रधानांकडे मागणी

टीम लय भारी

मुंबई : अंडरवर्ल्ड दाऊद इब्राहिम सध्या पाकिस्तानमधील कराची शहरात असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे त्याला कोणत्याही परिस्थितीत भारतात आणा, अशी विनंती राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. रोहित पवार यांनी ट्विटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग करुन ही मागणी केली आहे (Rohit Pawar Demand to PM Narendra Modi to do everything for bring Dawood Ibrahim in India).

महाराष्ट्रात प्रथमच युतीचं सरकार आलं होतं तेव्हा भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी दाऊदला फरफट आणू असं सांगितलं होतं. सत्तेत असताना दाऊदला का आणलं नाही अशी टीका त्यांच्यावर विरोधकांनी केली होती. त्यानंतर भाजपच्या ब-याच नेत्यांनी प्रचाराच्या दरम्यान दाऊदला पकडून आणू असे वक्तव्य केले होते.

“दाऊद इब्राहीम कराचीत असल्याचं पाकिस्तानं कबूल केलं आहे. त्याला भारतात आणण्यासाठी सर्वोत्तोपरी प्रयत्न करा, अशी मी पतंप्रधान नरेंद्र मोदींना विनंती करतो. दाऊदला कुठल्याही परिस्थितीत भारतात आणा”, असं रोहित पवार म्हणाले आहेत (Rohit Pawar Demand to PM Narendra Modi to do everything for bring Dawood Ibrahim in India).

दाऊद इब्राहिम कराची शहरात असल्याच्या वृत्ताला पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानेही दुजोरा दिला आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्यावतीने (UNSC) जगभरातील 88 दहशतवादी नेत्यांची एक यादी तयार करण्यात आली आहे. यात दाऊद इब्राहिम आणि त्याच्या सहकाऱ्यांचीही नावं आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी