28.1 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeटॉप न्यूजशरद पवारांकडून विजयसिंह मोहिते पाटलांना ‘डोस’

शरद पवारांकडून विजयसिंह मोहिते पाटलांना ‘डोस’

टीम लय भारी

मुंबई : विजयसिंह मोहिते पाटील यांच्या बहुतांश सहकारी संस्था रसातळाला गेल्या आहेत. सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साखर कारखाना शेवटच्या गटांगळ्या खात आहे. आता या संस्थेला वाचविण्यासाठी शरद पवार यांनी ‘डोस’ द्यायला सुरूवात केली आहे ( Sharad Pawar taken action for Vijaysinh Mohite Patil).

सहकारी संस्था, साखर कारखाने वाचले पाहीजेत, अशी शरद पवार यांची आग्रही भूमिका असते. विजयसिंह मोहिते पाटील यांच्या विविध सहकारी संस्थांचे माळशिरस, अकलूज व सोलापूरमध्ये मोठे जाळे होते. पण अंधाधूंद कारभारामुळे सगळ्या संस्थांची वाताहत झाली आहे. सहकारमहर्षी साखर कारखाचीही दयनीय स्थिती आहे. हा कारखाना वाचावा म्हणून प्रादेशिक साखर सहसंचालकांकरवी पवार यांनी ‘डोस’ द्यायला सुरूवात केली आहे.

साखर कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त करून त्या ठिकाणी प्रशासक नेमण्याच्या हालचाली राज्य सरकारने सुरू केल्या आहेत. कारखान्याने अन्य दोन कारखान्यांना दिलेल्या पाच कोटी रूपयांच्या वसुलीचेही आदेश सहसंचालकांनी दिले आहेत. संचालक मंडळाच्या मनमानी कारभाराला चाप लावून कारखाना सुरळीत करण्यासाठी खुद्द शरद पवार यांनीच प्रयत्न सुरू केल्याचे सूत्रांनी ‘लय भारी’शी बोलताना सांगितले.

हे सुद्धा वाचा

ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्याला ‘कोरोना’ची लागण, आतापर्यंत 7 मंत्री ‘कोरोना’बाधित

बाळासाहेब थोरातांचे सातारा जिल्हाधिकाऱ्यांना आदेश, नऊ कोरोनाबाधित प्रकरणाचा अहवाल पाठवा

देवेंद्र फडणविसांचे बोलून झाले, अन् अजितदादांनी फवारा मारला

अजितदादा म्हणाले, जयंत पाटील माझ्यावर कारवाई करतील

‘महाविकास आघाडी’चे ४५ आमदार फुटीच्या मार्गावर

पतसंस्थेच्या २०० कोटींच्या ठेवींमध्ये अफरातफर

मोहिते पाटील यांच्या सुमित्रा पतसंस्थेमध्ये सर्वसामान्य लोकांच्या तब्बल २०० कोटींच्या ठेवी होत्या. या ठेवी परत मिळाल्या नसल्याने हजारो ठेवीदार हवालदील झाले. सहा जणांनी आत्महत्या केल्या. एक जणाने तर जिल्हाधिकारी कार्यालयातच रॉकेल ओतून आत्महत्या केली होती. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी मोहिते पाटील यांच्या विरोधात अटक वॉरंट बजावण्यात आले होते.

मोहिते पाटील यांच्यावर कारवाई होऊ नये म्हणून तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभय मिळाले होते. पुढे मोहिते पाटील पिता पुत्रांनी भाजपमध्येच प्रवेश केला.

साखर कारखान्यांची विल्हेवाट

शिवराज व विजय या दोन्ही साखर कारखान्यांची यापूर्वीच मोहिते पाटील यांनी विक्री केली आहे. एफआरपीनुसार शेतकऱ्यांची बिले दिलेले नाहीत. उसतोडणीचे पैसे दिलेले नाहीत. कामगारांचे पगार दोन वर्षांपासून दिलेले नाहीत. संगनमत करून एका संस्थेकडून दुसऱ्या संस्थेत कोट्यावधी रूपये हस्तांतरीत केले आहेत. असे ‘नको ते उद्योग’ मोहिते पाटील यांनी करून ठेवले आहेत. या पार्श्वभूमीवर मोहिते पाटील घराण्यातील शेवटचा सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील हा एकमेव कारखाना वाचविण्यासाठी पवार यांनी पाऊले उचलली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Mahavikas Aghadi

lay bhari

येथे क्लिक करा, व फेसबुक पेज लाईक करा 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी