29 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्याला ‘कोरोना’ची लागण, आतापर्यंत 7 मंत्री ‘कोरोना’बाधित

ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्याला ‘कोरोना’ची लागण, आतापर्यंत 7 मंत्री ‘कोरोना’बाधित

टीम लय भारी

मुंबई : ठाकरे सरकरमधील आणखी एका मंत्र्यांना ‘कोरोना’ची लागण झाली आहे. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची चाचणी ‘कोरोना’ पॉझिटिव्ह आली आहे. त्यांना कराड येथील कृष्णा रूग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले ( Balasaheb Patil tested corona positive ).

बाळासाहेब पाटील यांची शुक्रवारी वैद्यकीय चाचणी करण्यात आली होती. त्याबाबतचा अहवाल रात्री उशिरा प्राप्त झाला आहे. त्यानुसार त्यांना ‘कोरोना’ची लागण झाल्याचे निदान झाले आहे.

पाटील यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर व्यवस्थित उपचार सुरू आहेत. काळजी करण्याची गरज नाही अशी माहिती पाटील यांचे चिरंजीव जशराज पाटील यांनी दिली आहे. संपर्कात आलेल्या लोकांनी ‘कोरोना’ची करुन घ्यावी, शिवाय किमान आठवडाभर विलगिकरणात रहावं असे आवाहन बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.

हे सुद्धा वाचा

अजितदादांच्या ‘संपर्का’तील मंत्र्याला ‘कोरोना’ची लागण, अन्य मंत्र्यांची पाचावर धारण

खळबळजनक :  साताऱ्यातील ‘त्या’ मृतदेहामुळे एकाच कुटुंबातील नऊ जणांना ‘कोरोना’ची लागण, प्रशासनाच्या बेफिकीरीचा परिणाम

Breaking: पोलिसांच्या बदल्यांना पुन्हा मुदतवाढ, ५ सप्टेंबरपर्यंत नवी मुदत

बाळासाहेब थोरातांचे सातारा जिल्हाधिकाऱ्यांना आदेश, नऊ कोरोनाबाधित प्रकरणाचा अहवाल पाठवा

देवेंद्र फडणविसांना जमले नाही, ते आदित्य ठाकरेंनी करून दाखविले

यापूर्वी सात मंत्र्यांना ‘कोरोना’ची लागण झाली आहे. यात जितेंद्र आव्हाड, अशोक चव्हाण, धनंजय मुंडे, अस्लम शेख, अब्दुल सत्तार, संजय बनसोडे यांना ‘कोरोना’ची लागण झाली आहे. हे सगळे मंत्री ‘कोरोना’तून बरे झाले आहेत. आता बाळासाहेब पाटील हे सातवे मंत्री ‘कोरोना’बाधित ठरले आहेत.

बाळासाहेब पाटील हे साताऱ्याचे पालकमंत्री आहेत. ‘कोरोना’ची लागण झाल्यामुळे ‘प्रोटोकॉल’नुसार सातारा येथील स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजारोहण सोहळ्याला सुद्धा त्यांना उपस्थित राहाता आले नाही.

Mahavikas Aghadi

lay bhari
येथे क्लिक करा, व फेसबुक पेज लाईक करा

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी