26 C
Mumbai
Tuesday, July 2, 2024
Homeटॉप न्यूजFarmers movement : शेतकरी आंदोलनाला शिवसेनेचा पाठिंबा

Farmers movement : शेतकरी आंदोलनाला शिवसेनेचा पाठिंबा

अकाली दलाच्या शिष्टमंडळाने घेतली उद्धव ठाकरेंची भेट, दिल्लीतील बैठकीला उद्धव ठाकरे हजेरी लावणार

टीम लय भारी
 
मुंबई : केंद्रातील भाजप सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात शेतक-यांनी पुकारलेल्या आंदोलनाला (Farmers movement) शिवसेनेचा (Shivsena) पाठिंबा असल्याचे तसेच मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) दिल्लीतील बैठकीला उपस्थित रहाणार असल्याचे अकाली दलाच्या नेत्यांनी सांगितले.

शिरोमणी अकाली दलाच्या शिष्टमंडळाने रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी शेतकरी आंदोलनाला आपला पाठिंबा असेल, असे आश्वासन दिल्याची माहिती अकाली दलाच्या नेत्यांनी दिली.

भेटीनंतर अकाली दलाच्या नेत्यांनी सांगितले की, शेतकरी आंदोलनादरम्यानच्या सर्व कार्यक्रमांना शिवसेनेचा पाठिंबा असेल. दिल्लीत दोन आठवड्यांनंतर होणा-या शेतक-यांसोबतच्या बैठकीलाही उद्धव ठाकरे हजेरी लावणार आहेत, असे अकाली दलाच्या नेत्यांनी सांगितले

शिरोमणी अकाली दल आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष याआधी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) सदस्य होते. त्यामुळे त्यांच्यामध्ये मैत्रीचे संबंध आहेत. शिवसेनेने महाराष्ट्रात भाजपाला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सत्ता स्थापन करण्याचे निश्चित केले आणि महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आणि शिवसेना एनडीएतून बाहेर पडली. तसेच मोदी सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांना कडाडून विरोध करताना शिरोमणी अकाली दलानेही काही महिन्यांपूर्वी एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत सुरु असलेल्या उग्र आंदोलनात (farmers protest) अकाली दलाचा (Akali Dal) सहभाग असून या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळवण्याचा आणि हे कायदे रद्द करण्यास भाग पाडण्यासाठी सरकारवर दबाव आणण्याचा अकाली दलाचा प्रयत्न आहे. याच उद्देशाने अकाली दलाच्या शिष्टमंडळाने मुंबईत येऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्याची विनंती केली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी