टीम लय भारी
टोकियो : भारताची महिला टेबल टेनिस खेळाडू भाविना पटेल हिने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. आज टोकियो क्रीडा स्पर्धेत महिला एकेरी वर्ग ४ च्या उपांत्य फेरीत चीनच्या झांग मियाओचा ७-११, ११-७, ११-४, ९-११, ११-८ असा पराभव केला. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवणारी ती पहिली भारतीय महिला आहे (Table tennis player Bhavina Patel made history).
भाविना पटेल अंतिम फेरीत पोहचल्याने भारतासाठी रौप्य पदक आता निश्चित झाले आहे. जर आता असलेल्या सुपर फॉर्ममध्ये तिने जर ऐतिहासिक कामगिरी केली आणि अंतिम फेरीही जिंकली तर ती भारताला टोकियो पॅरालिम्पिक गेम्सच्या इतिहासातील ५ वे सुवर्णपदकही मिळवून देईल.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला हॉकी संघाने रचला इतिहास
टोकियो ओलिम्पिकच्या सेमिफायनल मध्ये पी. व्ही. सिंधूच्या हाती निराशा; परंतु तिला आणखी एक संधी मिळणार
भाविना पटेलचे हे पहिले पॅरालिम्पिक आहे आणि तिच्या पहिल्याच प्रयत्नात तिने क्रीडा क्षेत्रातील सर्वात मोठ्या मंचावर उत्तम कामगिरी केली आहे. अहमदाबादच्या ३४ वर्षीच्या भाविनाने यापूर्वी उपांत्य फेरीचे तिकीट बुक केले होते. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर आणि २०१६ च्या रिओ पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता सर्बियाच्या बोरिस्लावा पेरिच रॅन्कोवीला उपांत्यपूर्व फेरीत सरळ गेममध्ये ३-० ने पराभूत केले होते आणि आता उपांत्य फेरीत तिने चीनी पॅडलरला ३-२ ने पराभूत केले (In the semi-finals, she defeated the Chinese Paddler 3-2).
And that’s how she did it! 💪#IND‘s @BhavinaPatel6‘s winner that sealed her a spot in the Class 4 #ParaTableTennis gold medal final!
Watch 🎥 👇#Paralympics #Tokyo2020pic.twitter.com/E4N3GXlN6T
— #Tokyo2020 for India (@Tokyo2020hi) August 28, 2021
टोकियो ऑलिम्पिक 2020 मधील तिसऱ्या दिवशी मेरी कोम आणि पी व्ही सिंधुकडून भारताला मोठ्या विजयाची आशा
Bhavina assures India of first medal at Tokyo Paralympics
भाविनाचे लक्ष्य आता सुवर्णपदक आहे, कोणत्याही परिस्थितीत मी सुवर्णपदक जिंकणारच, असा तिचा विश्वास आहे. अंतिम फेरीत मी शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करीन आणि सामना जिंकेल, असे पहिली पॅरालिम्पिक खेळणारी भाविना म्हणाली. जेव्हा मी इथे खेळायला आली होती, तेव्हाही मी फक्त या विचारात होती की फक्त खेळावर लक्ष केंद्रित करावे आणि सामन्यात सर्वोत्तम कामगिरी करावी आणि आतापर्यंत हेच करत आहे. आता फक्त एका सामन्यााचा विषय आहे, असे भाविना म्हणाली.
टोकियो पॅरालिम्पिकमधील टेबल टेनिस स्पर्धेत भाविनाने अंतिम फेरी गाठत रौप्य पदक मिळवले आहे. सुवर्णपदक जिंकण्याचे तिचे लक्ष्य आहे आणि ज्या सुपर फॉर्म मध्ये भाविना आहे, ते पाहून ती सुवर्णपदक सुद्धा नक्की जिकेंल, असा विश्वास भारतीयांना वाटत आहे (Indians believe that she will win the gold medal too).