28 C
Mumbai
Saturday, July 6, 2024
Homeटॉप न्यूजWedding : काय सांगता! मुलीच्या लग्नात आईसुद्धा चढली बोहल्यावर

Wedding : काय सांगता! मुलीच्या लग्नात आईसुद्धा चढली बोहल्यावर

टीम लय भारी

मुंबई : एका मांडवात दोन बहिणींचं तर कधी दोन भावांचं लग्न (Wedding) झाल्याचं पाहीलं असेल. पण मुलीच्या लग्नात आईनेही लग्न केल्याचे कधीच ऐकले नसेल. पण अशीच एक आश्चर्यकारक आणि कौतुकास्पद म्हणावी अशी घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये सामुदायिक विवाह सोहळ्यात आईने आधी मुलीचं कन्यादान केलं. नंतर स्वत: सप्तपदी घेतली. अगदी उत्साहात हे लग्न पार पडलं. या अनोख्या लग्नाची सध्या सगळीकडे चर्चा रंगली आहे.

गोरखपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका सामूहिक विवाह सोहळ्यात ६३ जोडप्यांचं एकत्र लग्न लागणार होतं. ज्यात पिपरॉलीच्या रहिवाशी बेला देवी यांच्या इंदू नावाच्या मुलीचं राहुल नावाच्या मुलाशी लग्न ठरलं होतं. या सोहळ्यात बेला देवी यांनी आधी मुलीचं लग्न लावलं. नंतर त्या नवरी बनून आल्या आणि त्याच मांडवात त्यांनीही लग्न केलं. अशाप्रकारची ही पहिलीच घटना असावी.

२५ वर्षांपूर्वी बेला देवी यांच्या पतीचं निधन झालं होतं. दोन मुलं आणि तीन मुलींचा त्यांनी सांभाळ केला. चौघांची लग्ने आधीच झाली होती. सामूहिक विवाह सोहळ्यात सर्वात लहान मुलगी इंदूचंही लग्न लावून दिलं. पण आता त्या एकट्या पडणार होत्या. पुढील आयुष्य जगण्यासाठी जोडीदार निवडण्याचा निर्णय घेत ५५ वर्षीय दीर जगदीश यांच्यासोबत त्यांनी लग्न केलं. बेला देवी यांचा दीर अविवाहित होता. आणि बेला देवी सुद्धा आता एकट्या पडणार होत्या. त्यामुळे त्यांनी सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न करण्याचा निर्णय घेतला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी