30 C
Mumbai
Monday, May 13, 2024
Homeटॉप न्यूजबाबाजी दाते महिला सहकारी बँक खातेदार आणि भागधारक संयुक्त कृति समितीचा रविवारी...

बाबाजी दाते महिला सहकारी बँक खातेदार आणि भागधारक संयुक्त कृति समितीचा रविवारी संघर्ष मेळावा

टीम लय भारी

मुंबई: रिझर्व बँकेने 8 नोव्हेंबर 2021 रोजी बाबाजी दाते महिला सहकारी बैंक लि. यवतमाळ या बैंकेच्या सर्व व्यवहारावर निर्बंध लादले आहेत. त्या विरुध्द रविवार 21 नोव्हेंबररोजी सकाळी 11 वाजता भव्य संघर्ष मेंळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. दारव्हा रोड, लोहारा यवतमाळ येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले (Yavatmal : A rally was organized against the Reserve Bank of India).

रिझर्व बँकेच्या निर्बंधामुळे बँकेच्या सर्व ठेवीदार आणि सभासद यांच्यात संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे. रिझर्व बँकेने प्रत्येक ठेव खाते धारकाला फक्त 5000 रुपये काढण्याची मुभा दिली आहे. ठेवीदारांना कष्टांचे पैसे काढतां येणार नाही. हा मेाठा धक्का बसला आहे. अशा वेळी खाते धारकाच्या उर्वरीत रकमेचे काय हा प्रश्न पडला आहे.

‘त्या सेलिब्रिटींनी शेतकऱ्यांचं अभिनंदन करावं, भाजपला टॅग केलं तरी हरकत नाही’

महिला आमदाराचा अश्लील व्हिडीओ व्हायरल

Yavatmal : A rally organize against Reserve Bank of India
रिझर्व बँक ऑफ इंडिया

बँक प्रशासन कोणतेही उत्तर न देता सरळ रिज़र्व बँकेचे निर्बंध असल्याचे सांगत आहे. सर्व सर्वसाधारण लोकांनी या बँकेवर विश्वास ठेवला. सदर प्रकरणात खातेदार आणि शेयर होल्डर यांची कृति समिती तयार करुन सामूहिक लढा उभारणे हाच एकमेव पर्याय आहे.

बैंकेत झालेले गैरव्यवहार असेात किंवा बँकेचा वाढलेला NPA असो याच्याशी सर्वसाधारण ग्राहकाचा काहीही संबंध नाही. बँकेत आपला पैसा व्याजासहीत परत कसा मिळवता येइल हे आव्हान आहे. हे आव्हान पेलणे आवश्यक आहे. आपल्याला संघटीत झाल्या शिवाय व नेमका संघर्ष केल्या शिवाय यश मिळणार नाही. त्यासाठी संघर्ष मेळावयाचे आयोजन करण्यात आले आहे.

अंमली पदार्थांच्या विरोधात भाजपाची जनजागृती, तर जनजागृती केल्याप्रकरणी पोलिसांनी बजावली नोटीस

Fresh Covid cases in Maharashtra stay below 1,000; districts push to boost vaccination

काय आहे मेळाव्याचा उद्देश

या बैठकीसाठी बँकीग क्षेत्रातील तज्ञ व ऑल इंडिया बॅंक एमपलॅाईज असेासिएशनचे माजी सेक्रेटरी विश्वास उटगी यांना आमंत्रित करण्यात आले आहे ते मुंबईहून मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी येत आहे. या बैठकीला बँकेचे सर्व खातेदार सभासद यांनी मोठ्या संखेने उपस्थित रहावे ही विनंती बैंक ठेवीदार आणि भागधारक यांचे एकत्रीकरण करुन बँकेचे पुनरुज्जीवन करणे हाच परिषदेचा मुख्य हेतू आहे.

ठेवीदारंच्या ठेवी 100% सुरक्षित करण्यासाठी काय करावे याकरिता या मेळाव्याच्या माध्यमातून रस्त्यावर उतरून लढा देणे आणि न्यायालयीन लढा देण्याची सुरवात करण्याच्या हेतूने हा संघर्ष मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी