31 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeटॉप न्यूजYezdi Adventure मोटारसायकल लवकरच भारतात लाँच होणार, रॉयल एनफील्डला देणार टक्कर

Yezdi Adventure मोटारसायकल लवकरच भारतात लाँच होणार, रॉयल एनफील्डला देणार टक्कर

टीम लय भारी

मुंबई : Yezdi adventure मोटरसायकल लवकरच भारतीय दुचाकी बाजारात दाखल होणार आहे. या मोटरसायकलचा फोटो नुकताच लीक झाला आहे, ज्यामध्ये बाईकच्या डिझाइनसह काही वैशिष्ट्यांविषयी माहिती उपलब्ध आहे(Yezdi Adventure Motorcycle to be launched in Indian bikes soon)

दुसरीकडे, क्लासिक लिजेंड्सचे सह-संस्थापक अनुपम थरेजा यांनी ट्विट केले आहे की, आता दुसऱ्या भावाला परत आणण्याची वेळ आली आहे. @jawamotorcycles काय म्हणता?.

स्वातंत्र्याबाबत कंगनाची मुक्ताफळे ; देशभरात संताप; पद्मपुरस्कार परत घेण्याची मागणी

ESIS Recruitment 2021: महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा रुग्णालय ठाणे येथे भरती

थरेजा यांनी त्यांच्या ट्विटच्या शेवटी ‘#Y’ वापरला आहे, जो भारतात Yezdi लाँच करण्याचे संकेत देतो. काही दिवसांपासून या बाईकच्या टेस्टिंगच्या बातम्याही येत आहेत. आता कंपनीच्या प्रमुखाने फोटो आणि माहिती दिल्यानंतर ही बाईक लवकरच लाँच होईल, असे वाटते. मात्र, लॉन्चिंग टाइमलाइनबाबत अद्याप माहिती देण्यात आलेली नाही.

ट्रेडमार्क आणि वेबसाइटसाठी नोंदणी

कंपनीने Yezdi Roadking साठी ट्रेडमार्क देखील नोंदवला आहे. यासोबतच YezdiRoadking.com ही वेबसाइटही नोंदणीकृत करण्यात आली आहे, जी बाईक आणि किमतीशी संबंधित माहिती देईल. सध्या yezdi.com नावाची वेबसाइट असली तरी. यामध्ये या क्लासिक बाइकचे जुने फोटो आणि स्केचेस आहेत. या साईटवर बाईकचा आतापर्यंतचा प्रवास आणि यश दाखवण्यात आले आहे.

गुजरातेतल्या द्वारकेत 350 कोटींचं ड्रग्ज पकडलं, संजय राऊत, आता मलिकांनी भाजपला घेरलं?

Upcoming Yezdi adventure motorcycle spotted undisguised

Yezdi च्या दोन बाईक्स लाँच होण्याची शक्यता

वृत्तांवर विश्वास ठेवला तर, भारतात लवकरच दोन Yezdi मोटरसायकल सादर केल्या जातील. यामध्ये रोडकिंग आणि एडीव्ही या गाड्यांचा समावेश असेल. दोन्ही मोटारसायकल एकाच प्लॅटफॉर्मवर तयार केलेल्या असतील असा विश्वास आहे. या बाईक नोव्हेंबर महिन्यात लॉन्च केल्या जातील, असा दावा एका वेबसाइटने केला असला तरी कंपनीने असा कोणताही दावा केलेला नाही. भारतीय बाजारपेठेत पेट्रोल व्यतिरिक्त आता इलेक्ट्रिक बाइक्स देखील तयार केल्या जात आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी