29 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रपोलिसांकडून झाली चूक, चित्रा वाघ यांची कारवाईची मागणी

पोलिसांकडून झाली चूक, चित्रा वाघ यांची कारवाईची मागणी

टीम लय भारी
अकोला : जून 2019 मध्ये अकोल्याच्या एका अल्पवयीन मुलीला राजस्थान मध्ये विकल्याची घटना घडली होती. या घटना भारतात वारंवार पहावयास मिळतात (police being irresponsible to admit a 14 year old girl in children and women welfare).

कलम 363 अंतर्गत मुलींच्या अपहरणाच्या घटना देशाच्या आता सवयीच्या झाल्या आहेत. त्यांच्यावर आक्षेप घेणे सोडाच त्याविषयी सहानुभूती सुद्धा वाटेनाशी झाली आहे. अशीच एक घटना 2019 साली जून मध्ये घडली होती. अकोल्यातून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला राजस्थान येथे विकण्यात आले होते. (Hospital and police administration being irresponsible)

गोपीचंद पडळकरांच्या भेटी गाठी, माता – भगिनींनी केले स्वागत !

Police
अकोल्याच्या एका अल्पवयीन मुलीला राजस्थान मध्ये विकल्याची घटना

भाल्याची पोहोच सुवर्णपदकापर्यंत, खणखणलं चक्क सोनं!

यानंतर त्या मुलीने स्वतःची कशीबशी सुटका करून पोलिसांकडे धाव घेतली होती. त्याच वेळी तिला जीएमसी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. परंतु तेथून सुटल्यानंतर तिला कोणीही आधार देणारे, मार्ग दाखवणारे नव्हते. अशातच ती पुन्हा त्याच व्यवसायाकडे ओढली गेली.

काही दिवसांपूर्वी त्या ठिकाणी पोलिसांची धाड पडल्यानंतर त्या मुलीने तिच्याकडचे आधारकार्ड पोलिसांना दाखवले. त्यात तिचा जन्म 2005 चा असल्याचे समजते. म्हणजेच तिचे 2019 मध्ये वय 14 वर्षे इतके होते. अल्पवयीन मुलीला महिला व बालकल्याण विभागात भरती करणे आवश्यक होते व ही जबाबदारी पोलिसांची व रुग्णालय प्रशासनाची होती.

पोलिसांनी तिला अल्पवयीन नसल्याचे समजून तिच्या जीवावर व देवाच्या भरवशावर मोकळे सोडून दिले. पुन्हा त्या धंद्यात अडकल्यानंतर तिच्यावर जे अनन्वित अत्याचार झाले याची जाणीव या निगरगट्ट समाजाला नाहीच. धाड पडल्यानंतर सापडलेली ही 16 वर्षांची मुलगी आठ आठवड्यांची गर्भवती होती.

अबब ! नगरविकास विभागाचा १ हजार कोटीचा घोटाळा

 

Nagpur: BJP leader Chitra Wagh meets kin of man who ended life after police thrashing, demands dismissal of accused cops

महिला व बालकल्याण विभागाला कळवले असते तर एका अल्पवयीन मुलीचे भविष्य आज वेगळे असते. परंतु पोलिसांच्या आणि रुग्णालयाच्या बेजबाबदार वर्तणूकीमुळे आज एका जीवाचे भविष्य धूसर झाले आहे.

संबंधित पोलिसांना बालकल्याण विभागाने याविषयी प्रश्न विचारले असता, सांभाळून घ्या, आमच्याकडून चूक झाली असे उत्तर पोलिसांकडून मिळाले आहे.

या घटनेत ज्या आरोपींनी तिची विक्री केली होती त्यांच्या समवेतच ज्या पोलिसांनी आणि रुग्णालय प्रशासनाने दिरंगाई केली त्या सर्वांविरोधात कारवाई करण्याची मागणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे. याविषयी आपले मत मांडताना ट्विटरवर त्यांनी एक व्हिडिओ सुद्धा शेयर केला आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी