29 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
HomeUncategorizedCovid19 : शरद पवारांनी राज्यपालांबद्दल नरेंद्र मोदींकडे केली तक्रार

Covid19 : शरद पवारांनी राज्यपालांबद्दल नरेंद्र मोदींकडे केली तक्रार

टीम लय भारी

मुंबई : ‘कोरोना’ ( Covid19 ) आपत्तीमध्ये राज्यपालांकडून अधिकाऱ्यांनाही स्वतंत्र सुचना दिल्या जात आहेत. त्यामुळे राज्यात दोन सत्ताकेंद्र निर्माण होणार होणार नाहीत याची काळजी घ्यावी अशी मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.

‘कोरोना’च्या ( Covid19 ) अनुषंगाने नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे विविध नेत्यांशी चर्चा केली. त्यावेळी पवार यांनी ही तक्रार केली आहे. या चर्चेचा तपशिल पवार यांनी ट्विटरवरून प्रसारित केला आहे. ‘राज्य पातळीवर काही राज्यांमध्ये असे ऐकावयास मिळते की, माननीय राज्यपालांकडून देखील थेट कार्यकारी वर्गाला सूचना निर्गमीत होतात. राज्यपाल महोदयांना राज्याच्या बाबतीत सल्लामसलत करण्याचे अधिकार आहेत. ते त्यांनी जरूर वापरावेत. मात्र मुख्यमंत्री आणि राज्याचे मुख्य सचिव यांच्यामार्फत तसे झाल्यास राज्यात दोन सत्ताकेंद्रे होणार नाहीत’ असे पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे.

अनेक राज्यांमध्ये असा प्रकार घडत असल्याचे पवार यांनी म्हटले आहे. महाराष्ट्राचा थेट उल्लेख त्यांनी केलेला नाही. परंतु अन्य राज्यांबरोबरच महाराष्ट्रातही असा प्रकार होत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. केंद्र सरकार राज्यपालांच्या माध्यमातून राज्यांवर अंकुश ठेवत आहे की काय अशीही शंका पवार यांच्या या ट्विटमुळे निर्माण झाली आहे.

कोरोना महामारीवर मात करण्यासाठी पवार यांनी यावेळी अनेक महत्वाच्या सुचना केल्या. मरकजसारख्या घटनांतून सामाजिक वातावरण बिघडविणाऱ्यांवर कारवाई करण्याचीही मागणी पवार यांनी पंतप्रधानांकडे केली आहे.

हे सुद्धा वाचा

Narendra Modi यांचे संतापजनक आवाहन

WHO ने प्रसारित केलेली माहिती

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी