33 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeराजकीयकेंद्रीय मंत्र्यांची जीभ घसरली; शेतकऱ्यांना म्हणाल्या, 'मवाली'

केंद्रीय मंत्र्यांची जीभ घसरली; शेतकऱ्यांना म्हणाल्या, ‘मवाली’

टीम लय भारी

दिल्ली :- केंद्र सरकारने गतवर्षी काढलेल्या 3 कृषी कायद्यांना विरोध करत गेले 8 महिने दिल्ली सीमेवर शेतकऱ्यांचे कृषी आंदोलन सुरू आहे. देशभरातील शेतकऱ्याचा याला पाठिंबा आहे. अहिंसात्मक आंदोलन करणाऱ्या या शेतकऱ्यांना केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी यांनी ‘मवाली’ या शब्दात हिणवले आहे. “यांना शेतकरी म्हणू नका, हे तर मवाली आहेत” असे वक्तव्य त्यांनी केली आहे. त्यांच्या या वादग्रस्त विधानामुळे त्या आता वादात अडकल्या  आहेत (Union ministers lost their tongues Mawali told farmers).

शेतकऱ्यांचे ही कृत्य गुन्हेगारी कृत्य आहेत. याची दखल घेतली पाहिजे, 26 जानेवारीला जे काही झाले होते ते वाईट होते, त्यांना विरोधी पक्षांकडून प्रोत्साहन दिले गेले. अशा या मीनाक्षी लेखिंच्या विधानावर आता संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

अतिवृष्टीने बेहाल जनतेच्या मदतीसाठी कॉंग्रेसचे कार्यकर्ते सरसावले, नाना पटोलेंनी केले कौतुक

Breaking : पुरग्रस्तांच्या मदतीसाठी नौदलाची धाव, 7 तुकडया रायगड, रत्नागिरीला रवाना

किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी लेखींच्या या वक्तव्याला शांतपणे प्रतिक्रिया दिली आहे की, “मवाली नाही, शेतकरी आहेत”. त्याचप्रमाणे सोशल मीडियावर देखील या वादग्रस्त विधानावरून संताप व्यक्त केला जातो आहे. ‘त्यांनी माफी मागावी’ हा हॅशटॅग व्हायरल ट्रेण्ड होतोय. त्यावर मीनाक्षी यांनी स्पष्टीकरण देत म्हणल्या की, माझे वक्तव्य हे, 26 जानेवारी रोजी झालेल्या हिंसेप्रकरणी होते. या वरुन मवाली हा शब्द मी वापरला. माझ्या वक्तव्यामुळे जर कोणाच्या भावना दुखवल्या गेल्या असतील तर, मी माझे वक्तव्य मागे घेते (If anyone’s feelings have been hurt by my statement I withdraw my statement).

Union ministers lost their tongues Mawali told farmers
मीनाक्षी लेखी

राज्यातील अतिवृष्टीसाठी केंद्राकडून मदत मिळणार, पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना फोन

मीनाक्षी लेखी ने किसानों को बताया मवाली, राकेश टिकैट बोले-पहली बार सरकारने माना बॉर्डर पर बैठे लोग किसान हैं

गेले 8 महिने हे आंदोलन सुरू आहे. मात्र अद्याप या आंदोलनावर तोडगा निघालेला नाही. आजपासून राजधानी दिल्लीमध्ये किसान संसदेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी शेतकरी हे जंतरमंतर येथे दाखल झाले आहेत. दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल यांनी आजपासून 9 ऑगस्ट पर्यंत फक्त 200 शेतकऱ्यांना आंदोलनाची परवानगी दिली आहे. त्यांच्या सोबत दिल्ली पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी