28 C
Mumbai
Sunday, July 7, 2024
Homeव्हिडीओएकनाथ शिंदे; भ्रष्टाचार थांबवा, लोकांचे जीव वाचतील

एकनाथ शिंदे; भ्रष्टाचार थांबवा, लोकांचे जीव वाचतील

  महाराष्ट्र व देश हादरून टाकणारे तीन मोठे अपघात अवघ्या १५ दिवसांत झाले. धनिकाच्या अल्पवयीन पोरानं पुण्यात दोन निष्पापांचे बळी घेतले. त्या अगोदर घाटकोपर येथील होर्डिंग कोसळून १८ जणांचे बळी गेले (Eknath Shinde; Stop corruption, people's lives will be saved). अन् कालचा ताजा अपघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांचा पोरगा श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात झाला.

महाराष्ट्र व देश हादरून टाकणारे तीन मोठे अपघात अवघ्या १५ दिवसांत झाले. धनिकाच्या अल्पवयीन पोरानं पुण्यात दोन निष्पापांचे बळी घेतले. त्या अगोदर घाटकोपर येथील होर्डिंग कोसळून १८ जणांचे बळी गेले (Eknath Shinde; Stop corruption, people’s lives will be saved). अन् कालचा ताजा अपघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांचा पोरगा श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात झाला. डोंबिवलीमधील एमआयडीसीत झाला. तिथं आठ जणांचे जीव गेले. तिन्ही अपघातांमागील मूळ कारण हे भ्रष्टाचार आहे. जोपर्यंत भ्रष्टाचार थांबत नाही, तोपर्यंत अशा अपघातांवर नियंत्रण येणारच नाही. ज्या डोंबिवलीत हा अपघात झाला, त्या ठिकाणी दोन सरकारी यंत्रणांचं महत्वाचं नियंत्रण आहे.

महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळ म्हणजेच MIDC, आणि दुसरं महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ. या दोन्ही खात्यांच्या अधिकाऱ्यांना कोणती कंपनी काय काम करते, तिथ गैरप्रकार चालतात याची खडानखडा माहिती असते. डोंबिवलीत(Dombivali) यापूर्वीही अपघात झालेले आहेत. यापूर्वीही मृत्यू झालेले आहेत. असे असताना पुन्हा अपघात होवू नये यासाठी प्रयत्न झाले असतील का, तर नक्कीच झाली असतील. पण अशा प्रयत्नांना भ्रष्टाचाराची खीळ बसते. किंबहूना अशा घटना म्हणजे अधिकारी व लोकप्रतिनिधींना चालून आलेली आयतीच संधीच असते. कारण एमआयडीसींमधील दुर्घटनांचे निमित्त करून खासगी कंपन्यांवर दंडुके उगरायचे, दंडूका उगरला की कंपन्या लगेचच थैल्या घेवून येतात. थैल्या घेतल्या की, खासगी कंपन्यांना, कंत्राटदारांना बेकायदेशीर कृत्ये करण्याचा परवाना मिळून जातो.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी