31 C
Mumbai
Thursday, May 23, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रअक्षय तृतीयेनिमित्त बाजारात होणार कोट्यवधीची उलाढाल

अक्षय तृतीयेनिमित्त बाजारात होणार कोट्यवधीची उलाढाल

साडेतीन मुहूर्तपैकी एक असणाऱ्या अक्षयतृतीयेनिमित्त नाशिक शहर आणि जिल्हयात कोट्यवधींची आर्थिक उलाढाल होणार आहे. यानिमित्ताने फ्लॅट, सोने आणि दुचाकी, चारचाकी खरेदीसाठी नियोजन करण्यात आले असून यासाठी वेगवेगळ्या ऑफर विक्रेत्यांनी दिल्या आहेत. तसेच या दिवशी करा केळींच्या पूजनाला धार्मिक महत्व असल्याने साहित्य खरेदीसाठी नागरिकांनी शहराच्या विचिध भागात गुरुवारी गर्दी केली होती.अक्षयतृतीयेला घराघरात पूर्वजांच्या नावाने घागरी भरून विधीवत पूजा केली जाते तसेच पितरांना भोजन देण्याची प्रथा आहे.

साडेतीन मुहूर्तपैकी एक असणाऱ्या अक्षयतृतीयेनिमित्त (Akshaya Tritiya) नाशिक शहर आणि जिल्हयात कोट्यवधींची आर्थिक उलाढाल (Crores of rupees) होणार आहे. यानिमित्ताने फ्लॅट, सोने आणि दुचाकी, चारचाकी खरेदीसाठी नियोजन करण्यात आले असून यासाठी वेगवेगळ्या ऑफर विक्रेत्यांनी दिल्या आहेत. तसेच या दिवशी करा केळींच्या पूजनाला धार्मिक महत्व असल्याने साहित्य खरेदीसाठी नागरिकांनी शहराच्या विचिध भागात गुरुवारी गर्दी केली होती.अक्षयतृतीयेला (Akshaya Tritiya) घराघरात पूर्वजांच्या नावाने घागरी भरून विधीवत पूजा केली जाते तसेच पितरांना भोजन देण्याची प्रथा आहे.(Crores of rupees to be made in the market on Akshaya Tritiya)

त्यासाठी लागणारे घागर तसेच अन्य साहित्य शहरातील मुख्य बाजारपेठेसह उपनगरांमधील बाजारात अनेक दिवसापासून उपलब्ध झाले आहे. ते खरेदीसाठी गुरुवारी दिवसभर ग्राहकांकडून मोठी गर्दी करण्यात आली होती. साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या या सणाच्या दिवशी सोने-चांदी, वाहने, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, कपडे, भांडी खरेदीचा योग अनेक घरात वर्षानुवर्षे पाळला जातो. त्यामुले या वस्तूंची विक्री होणाऱ्या सर्वच दुकानांमध्ये गर्दी दिसूनयेत आहे . त्यामुळे गृहोपयोगी आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या बाजारात देखील मोठी उलाढाल होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून बाजारात ग्राहकांची वर्दळ वाढली असून, गृहपयोगी वस्तू खरेदीचा धडाका सुरु आहे. उन्हाळा असल्याने एसी, कुलर, फ्रिज आदींना मोठी मागणी आहे. विक्रेत्यांनी ऑफर्स उपलब्ध करून दिल्याने, मोबाइल, लॅपटॉप, कॅमेरा आदी वस्तूंची मागणी वाढली आहे.

हक्काच्या घराचा साधणार मुहूर्त
अक्षय तृतीयेच्या (Akshaya Tritiya) दिवशी हक्काचे घर घेण्याकडेही अनेकांचा कल असतो. सध्या नाशिक व परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकाम प्रकल्प सुरू असून, बहुतांश ठिकाणी रेडीपझेशन घरे उपलब्ध आहेत. ग्राहकांकडून सध्या साइट व्हिजिट केल्या जात असून, सणाच्या मुहूर्तावर बुकींग करण्याचे अनेकांनि नियोजन आहे. वाहन बाजारात देखील ग्राहकांची वर्दळ वाढल्याने, विक्रेत्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. दरम्यान, पूजेच्या साहित्यांपासून ते घरांच्या खरेदीपर्यतचा मुहूर्त अक्षयतृतीयेला  साधला जात असल्याने, सध्या बाजारात चैतन्याचे वातावरण बघावयास मिळत आहे

विविध प्रकारच्या आंब्यांना मागणी
पितर भोजणात आमरस करण्याची प्रथा असल्याने, सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात आंबा विकीस आणला आहे. रत्नागिरीचा हापूस, केसर, बादाम आंबा बाजारात दाखल झाला असून, गेल्यावर्षीच्या तुलनेत आंब्यांच्या दरात ३० टक्क्यांची वाढ झाल्याचे दिसून येत आहे. अक्षयतृ‌तीयापर्यंत  नाशिकच्या बाजारात आंब्याच्या किंमती बऱ्यापैकी कमी झालेल्या असतात. मात्र, यावेळेस आंब्यांच्या किंमती कमी झाल्या नसून, त्यात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. केसर व बदाम आंबा १२० ते २०० रुपये किलोने विकला जात आहे. रत्नागिरीचा हापूस १२०० ते १४०० रुपये डझन असून, २५० ते ३०० रुपये किलोने विकला जात आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी