25 C
Mumbai
Sunday, February 5, 2023
घरव्हिडीओVIDEO : शरद साखर कारखान्यात होतोय आर्थिक गैरव्यवहार : अंबादास दानवे

VIDEO : शरद साखर कारखान्यात होतोय आर्थिक गैरव्यवहार : अंबादास दानवे

औरंगाबादचे पालकमंत्री संदीपान भूमरे यांनी शरद साखर कारखान्यात प्रचंड गैरव्यवहार केला आहे. तसेच शहरात त्यांची नऊ दारूची दुकाने आहेत. असा आरोप विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केला आहे.औरंगाबादचे पालकमंत्री संदीपान भूमरे यांनी शरद साखर कारखान्यात प्रचंड गैरव्यवहार केला आहे. तसेच शहरात त्यांची नऊ दारूची दुकाने आहेत. असा आरोप विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केला आहे.

औरंगाबादचे पालकमंत्री संदीपान भूमरे यांनी शरद साखर कारखान्यात प्रचंड गैरव्यवहार केला आहे. तसेच शहरात त्यांची नऊ दारूची दुकाने आहेत. असा आरोप विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केला आहे. संदीपान भूमरे यांनी मनी लॉंड्रिंगच्या माध्यमातून केलेल्या या व्यवहाराचे पूरावे माझ्याकडे असून ते मी लवकरच समोर आणणार असल्याचा इशारा देखील अंबादास दानवे यांनी दिला. मनी लाँड्रिंग सारखा प्रकार या कारखान्यात सुरु असून स्वतःच्या विकासासाठी हे सगळं चालू आहे. असं देखील दानवे म्हणाले. शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची सध्या राज्यभरात महाप्रबोधन यात्रा सुरू असून पैठण येथे झालेल्या सभेत अंबादास दानवे यांनी फलसंवर्धन, आणि औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भूमरे यांच्यावर हल्लाबोल केला.त्यावर संदीपान भुमरे, अंबादास दानवे यांनी समोरासमोर बसून चर्चा करावी मग त्यांच्या आरोपांना उत्तर देऊ.असं व्यक्तव्य केलं आहे.

याबाबत अंबादास दानवे यांनी ट्विट देखील केले आहे. ट्विट मध्ये त्यांनी हे नमूद केले आहे की, “शरद साखर कारखान्यात गद्दार मंत्री संदीपान भूमरे यांनी प्रचंड आर्थिक गैरव्यवहार केला आहे. मनी लॉंड्रिगच्या माध्यमातून केलेल्या या व्यवहाराचे पुरावे माझ्याकडे आहेत. लवकरच याचे पुरावे मी समोर आणणार आहे”.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!