30 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रKoshyari's controversial statement : राज्यपाल कोश्यारी यांचे छत्रपती शिवरायांबाबत पून्हा वादग्रस्त वक्तव्य

Koshyari’s controversial statement : राज्यपाल कोश्यारी यांचे छत्रपती शिवरायांबाबत पून्हा वादग्रस्त वक्तव्य

छत्रपती शिवाजी महारांजाबद्दल महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दुसऱ्यांदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे राज्यपालांवर टीकेची झोड उठली आहे. औरंगाबाद येथे एका कार्यक्रमात राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले.

छत्रपती शिवाजी महारांजाबद्दल महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दुसऱ्यांदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे राज्यपालांवर टीकेची झोड उठली आहे. औरंगाबाद येथे एका कार्यक्रमात राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा आज 62 वा दिक्षांत समारंभ झाला. या समारंभात या कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना डी. लिट पदवीने सन्मानित करण्यात आले. यावेळी संमारंभात राज्यपाल बोलत होते.

‘छत्रपती शिवाजी महाराज तो पुराने जमाने की बात है, अभी तुम्हारे सामने गडकरी जैसे आदर्श है’ असे वक्तव्य राज्यपाल डॉ. भगत सिंग कोश्यारी यांनी केले. याआधीही देखील राज्यपाल कोश्यारी यांनी औरंगाबादमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावेळी ते म्हणाले होते, ‘समर्थ रामदासांविना छत्रपती शिवाजी महाराजांना कोणी विचारलं असतं’, त्यावेळी राज्यपालांच्या वक्तव्यामुळे राज्यपालांविरोधात मोठा असंतोष निर्मान झाला होता.
राज्यपाल कोश्यारी यांनी या आधी देखी महाराष्ट्रातील महापुषांच्याबाबत अशीच वादग्रस्त वक्तव्ये केली होती, पुण्यात एका सभेत बोलतांना त्यांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर मुंबई आणि गुजरातबाबत देखील त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे त्यांच्यावर त्यावेळी देखील मोठी टीका झाली होती.

राज्यपालांच्या शिवरायांच्या वक्तव्यानंतर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती आक्रमक झाले असून त्यांनी राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध करत, राज्यपालांना महाराष्ट्राच्या बाहेर पाठवा असे म्हटले आहे. संभाजीराजे म्हणाले की, राज्यपाल अशी बडबड का करतात हा प्रश्न मला पडला असून त्यांना महाराष्ट्राच्या बाहेर काढा. मी पंतप्रधान मोदींना विनंती करतो की, अशी व्यक्ती महाराष्ट्रात नको, तसेच छ. शिवाजी महाराज आणि महापूरुषांबाबत असे घाणेरडे विचार घेऊन कोणी महाराष्ट्रात येतच कसं असा संतप्त सवाल देखील त्यांनी केला आहे.

हे सुद्धा वाचा :

Mumbai Mahanagarpalika : मुंबईसाठी नुसत्याच विकासाच्या गप्पा; शौचालयांअभावी महिलांची कुचंबना

Terror Funding : टेरर फंडिंग प्रकरणात विद्यार्थ्याला अटक; ‘आयएसआय’च्या होता संपर्कात

KBC 14 : केबीसीच्या सेटवर अमिताभ बच्चनने सांगितला पाणीपुरीचा किस्सा

राज्यपालांच्या अशा वादग्रस्त वक्तव्यांमुळे याआधी देखील राज्यात त्यांच्याविरोधात मोठी टीका झाली आहे. त्यानंतर देखील राज्यपाल कोश्यारी यांची वादग्रस्त विधाने होतच असल्यामुळे खासदरास संभाजीराजे छत्रपतींनी आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच हात जोडून राज्यपालांना महाराष्ट्राच्या बाहेर घालविण्याची विनंती केली आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी