29 C
Mumbai
Wednesday, May 1, 2024
Homeव्हिडीओउन्हाळ्यात शरीराची उष्णता कमी करण्यासाठी सब्जा खाण्याचे गुणकारी फायदे जाणून घ्या...

उन्हाळ्यात शरीराची उष्णता कमी करण्यासाठी सब्जा खाण्याचे गुणकारी फायदे जाणून घ्या ..

सब्जा बियाणे हे आपल्या आरोग्यासाठी आणि त्याचबरोबर उन्हाळ्यातून आपल्या शरीराची उष्णता कमी ठेवण्यासाठी सगळ्यात महत्वाच बियाणं आहे.

उन्हाळा म्हटलं कि शरीराची होणारी लाही,चटके लागणार ऊन, कमी पाणी पियाल्यामुळे होणारा ऊष्माघात ह्या सगळ्यापासून आपल्या शरीराला निर्जलीकरण ( डिहायड्रेड ) ठेवण्यासाठी आपण रोज वेगवेगळ्या प्रकारचे ज्युस पितो , नारपाणी पितो जेणेकरून आपल्या शरीराची उष्णता कमी होते(know the health benefits of eating sabja to reduce body heat in summer).पण ह्या सगळ्यासोबतच महत्वाचं आहे ते म्हणजे सब्जा बियाणे हे आपल्या आरोग्यासाठी आणि त्याचबरोबर उन्हाळ्यातून आपल्या शरीराची उष्णता कमी ठेवण्यासाठी सगळ्यात महत्वाच बियाणं आहे.  सब्जामध्ये अँटी- ऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात, हे घटक आपल्या आरोग्यासाठी पोषक असतात या अँटी ऑक्सिडंटयुक्त बिया आपल्या शरीराचं फ्री रेडिकल्सपासून संरक्षण करण्याचे कार्य करतात सब्जामध्ये फायबर, प्रोटीन, कॅल्शिअम, मॅगनिज, मॅग्नेशिअम आणि फॉस्फरस हे घटक भरपूर प्रमाणात असतात.हे सगळे घटक आरोग्याचे चांगले पोषण होण्यासाठी अतिशय उपयुक्त असतात. सरबत, फालुदा, कोशिंबीर अशा विविध पदार्थांमधून देखील आपण  सब्जाचे सेवन करू शकतो  दिवसभरात कधीही सब्जाचे पाणी प्यायल्यास त्याचा फायदा होतो. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार सब्जाच्या सेवनाने आपल्याला बरेच आरोग्यवर्धक लाभ मिळतात. सब्जामध्ये असणारे अँटी- ऑक्सिडंटस आपल्या शरीराचं फ्री रेडिकल्सपासून संरक्षण करण्याचे कार्य करतात.या बियांमध्ये  भरपूर प्रमाणात फायबर आणि म्युसिलेज असल्यामुळे ते “आतड्याच्या हालचालींना चालना देऊन बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी, तृप्ति निर्माण करण्यासाठी,  किडनी डिटॉक्सिफाई करण्यासाठी आणि स्टार्चचे रक्तातील साखरेमध्ये हळूहळू रूपांतरण करून वजन कमी करण्यास मदत करतात. त्याचबरोबर आपल्या पचन प्रक्रियेसाठी सब्जा अतिशय लाभदायक आहे. सब्जामध्ये फायबरची मात्रा भरपूर  प्रमाणात असते, ज्यामुळे पचन प्रक्रिया सुरळीत सुरू राहते. आपण दिवसभरात कधीही सब्जाचे पाणी पिऊ शकता. यामुळे अन्नाचे पचन सहजरित्या होण्यास मदत मिळते. फिट राहण्यासाठी शरीराच्या पचन संस्थेचं कार्य योग्य पद्धतीने होणं आवश्यक आहे .

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी