29 C
Mumbai
Sunday, September 10, 2023
घरव्हिडीओ‘मेट्रो ३’ हवी की नको, मुंबईकरांना काय वाटते घ्या जाणून

‘मेट्रो ३’ हवी की नको, मुंबईकरांना काय वाटते घ्या जाणून

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबई मेट्रो ३ च्या प्रकल्पाची यशस्वी चाचणीच्या कार्यक्रमात उपस्थित होते. मुंबई मेट्रो ३ चा प्रकल्प हा कुलाबा-वांद्रे-सीप्ज या मार्गिकेवरून धावणार आहे. आमच्या लयभारीच्या टीमने या बदद्ल लोकांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यात आम्हाला हे जाणवले की लोक एकंदरीत या प्रकल्पाच्या बाबतीत उत्सुक आहेत. हा प्रकल्प सुरू झाला की लोकल ट्रेनची गर्दी कमी होईल. संध्याकाळी सामान्य जनतेला पश्चिम उपनगराच्या दिशेने जाताना लोकांना दगदग करावी लागणार नाही. सर्वसामान्य लोकांनी सरकार व शासकीय यंत्रणेला एवढेच आवाहन केले की हा प्रकल्प लवकरात लवकर सुरू करण्यात यावा. मुंबईच्या चाकरमान्यांची एवढीच मागणी आहे की या प्रकल्पाचे दर सर्वसामान्यांच्या खिश्याला परवडतील असे असावेत. कारण आता मुंबई मेट्रो चे दर साधारणत ५० रूपये आहेत व येत्या दोन-तीन वर्षामध्ये ते दर अजून वाढण्याची शक्यता आहे. त्याच्या फेऱ्या नियमित असाव्यात याची काळजी घेतली तर जनतेचा प्रवासाचा वेळ वाचेल व त्यांचा प्रवास सुखकर होईल.

नवेली कांबळे
नवेली कांबळेhttp://laybhari.in
Naveli Kamble is a reporter/ sub editor.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी