29 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeराजकीयआमदार संतोष बांगर यांची पुन्हा सटकली, सरकारी संघटना भडकली, वादाचा चेंडू आता...

आमदार संतोष बांगर यांची पुन्हा सटकली, सरकारी संघटना भडकली, वादाचा चेंडू आता मुख्यमंत्र्याच्या कोर्टात

यावेळी त्यांनी चक्क IAS अधिकाऱ्यालाच आपल्या विकृतपणाचे दर्शन घडविले आहे.

एकनाथ शिंदे गटातील आमदार संतोष बांगर आता अती करू लागले आहेत. आमदार झाल्यानंतर कोणालाही फटके देणे, शिव्या देणे, समोरच्याचा पाणउतारा करणे अशी कामे करण्याचा जणू काही परवाना मिळतो. संतोष बांगर यांनी आपल्या वर्तणुकीतूनच असा परवाना मिळत असल्याचे दाखवून दिले आहे. महिनाभरापूर्वी बांगर यांनी एका सरकारी कर्मचाऱ्याच्या कानाखाली मारली होती. त्याबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जनमाणसांमधून बांगर यांच्याविषयी संताप व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतरही बांगर यांच्यात काहीही सुधारणा झालेली नाही. त्यांनी पुन्हा एकदा नवे वादंग निर्माण केले आहे.कुत्र्यांचे शेपूट वाकडेच राहणार अशा पद्धतीने बांगर यांनी संतापजनक प्रकार केला आहे.

यावेळी त्यांनी चक्क IAS अधिकाऱ्यालाच आपल्या विकृतपणाचे दर्शन घडविले आहे. आरोग्य संचालक डॉ. आंबाडेकर यांना आमदार बांगर यांनी फोनवरून शिव्या दिल्या आहेत. अत्यंत खालच्या भाषेत डॉ. आंबाडेकर यांच्यावर बांगर यांनी संताप व्यक्त केला आहे.

maharashtra state employee central confideration

हे सुद्धा वाचा

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज ठाकरेंच्या भेटीने सर्वांच्या भूवया उंचावल्या

हाँगकाँग विरुद्धच्या विजयानंतर सूर्यकुमार यादवचे भारताचा कर्णधार रोहित शर्माने केले तोंड भरून कौतुक

NCP : हरियाणामधील एकता शक्ती पार्टीचे अध्यक्ष वीरेंद्र वर्मांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

काही वाहनचालक त्यांची समस्या घेवून आमदार बांगर यांच्याकडे गेले होते. त्यावर बांगर यांनी आंबाडेकर यांना फोन केला. ते बैठकीत असल्याने त्यांनी तो उचलला नाही. त्याबाबतचा एसएमएससुद्धा आंबाडेकर यांनी आमदार महोदयांना पाठवला. बैठक संपल्यानंतर आंबाडेकर यांनी बांगर यांना स्वतःहून परत फोन केला.
फोन आल्याबरोबर बांगर यांनी आंबाडेकर यांच्यावर शिव्यांची लाखोली वाहण्यास सुरूवात केली. गावंढळ पद्धतीने ते अद्वातद्वा बोलत सुटले.

वास्तवात, बांगर यांच्या दादागिरीबद्दल विधानसभेत सुद्दा चर्चा झाली होती. ‘सत्ता आली म्हणजे मस्ती आली का’ असा सवाल अजित पवार यांनी केला होता. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा आमदार बांगर व प्रकाश सुर्वे या दोघांना सबुरीने घेण्याची समज दिली होती.

इतके केल्यानंतर सुद्धा बांगर यांचा गुणउधळेपणा कमी झालेला नाही. त्यांनी पुन्हा एका IAS अधिकाऱ्यालाच शिव्या दिल्या आहेत.बांगर यांना आवरा अशी विनंती आता सरकारी कर्मचारी संघटनेने केली आहे. संघटनेने थेट मुख्यमंत्र्यांकडे भेटीची वेळ मागितली आहे.

ganpati bappa contest

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी