32 C
Mumbai
Tuesday, February 27, 2024
Homeव्हिडीओVideo : आदिवासी समाजासोबत राहुल गांधींनी धरला ठेका

Video : आदिवासी समाजासोबत राहुल गांधींनी धरला ठेका

वाशिम जिल्ह्यामध्ये राहुल गांधी यांनी आदिवासी समाजासोबत नृत्या वरती ठेका धरला. यावेळी काँग्रेसचे इतर नेतेही त्यांच्यासोबत त्याठिकाणी उपस्थित होते. आदिवासी समाजाच्या नृत्यावर ठेका करताना राहुल गांधी उत्साही दिसत होते.

7 सप्टेंबरला कन्याकुमारी येथून सुरू झालेली राहुल गांधींच्या नेतृत्वातील भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रामध्ये आहे. महाराष्ट्रामध्ये नांदेड जिल्ह्यातून या यात्रेतला सुरुवात झाली. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचे राज्यामध्ये स्वागत करण्यात आले. या यात्रेने राज्यात प्रवेश केल्यानंतर या यात्रेला राज्यातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सध्या भारत जोडो यात्रा विदर्भामध्ये आहे. विदर्भामधील वाशिममध्ये आदिवासी समाजाला संबोधित केल्यानंतर राहुल गांधी यांनी आपल्या पुढील यात्रेला सुरुवात केली.

राहुल गांधी हे यात्रेमधील लोकांशी संवाद साधताना दिसून येत आहेत. यामध्ये राहुल गांधी महिला, तरुण, लहान मुलं यांच्याशी बोलत त्यांचे मत जाणून घेताना दिसतात. दरम्यान, सध्या सोशल मीडियावर राहुल गांधी यांचा एक नृत्य करतानाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये राहुल गांधी यांनी आदिवासी समाजासोबत नृत्या वरती ठेका धरला. यावेळी काँग्रेसचे इतर नेतेही त्यांच्यासोबत त्याठिकाणी उपस्थित होते. आदिवासी समाजाच्या नृत्यावर ठेका करताना राहुल गांधी उत्साही दिसत होते. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून नागरिक सहभागी झालेले पाहायला मिळत आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी