28 C
Mumbai
Tuesday, December 6, 2022
घरव्हिडीओVideo : सुषमा अंधारेंनी दीपक केसरकरांना 'धुतले'

Video : सुषमा अंधारेंनी दीपक केसरकरांना ‘धुतले’

सुषमा अंधारे यांनी कोल्हापूर येथे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना संबोधित केले. यावेळी त्यांनी शिंदे गटातील काही नेत्यांवर जोरदार हल्ला चढवला, तर शिंदे गटाचे प्रवक्ते आणि मंत्री दीपक केसरकर यांना हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून खडेबोल सुनावले.

शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या महाप्रबोधिनी यात्रेचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे. महाप्रबोधिनी यात्रेच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये सुषमा अंधारे यांनी कोल्हापूर येथे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना संबोधित केले. यावेळी त्यांनी शिंदे गटातील काही नेत्यांवर जोरदार हल्ला चढवला, तर शिंदे गटाचे प्रवक्ते आणि मंत्री दीपक केसरकर यांना हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून खडेबोल सुनावले. सुषमा अंधारे यांच्या महाप्रबोधनी यात्रेचा तिसरा टप्पा हा कोल्हापूरच्या कुरुंदवाड येथून सुरू झाला. मंगळवारी एक विराट सभा झाल्यानंतर सुषमा अंधारे यांनी बुधवारी कोल्हापुरात पत्रकारांशी संवाद देखील साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवरून शिंदे फडणवीस सरकारवर टीका केली तसेच किरीट सोमय्या यांच्यावर देखील अंधारे यांनी आसूड ओढले.

या प्रबोधिनी यात्रेत सुषमा अंधारे यांनी भ्रष्टाचाराचे आरोप, शिंदेंचा दसरा मेळावा आणि नारायण राणे यांच्या बंगल्यावरील कारवाईचे आदेश अशा मुद्द्यांवरून भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यावर देखील निशाणा साधला. यावेळी सुषमा अंधारे यांनी शिंदे गटाचे दीपक केसरकर यांच्या बाबतीत काही प्रश्न उपस्थित केले. दीपक केसरकर हे 2014 मध्ये शिवसेनेमध्ये आले आणि 2012 मध्ये हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले. मग हिंदुत्वाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी केसरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांची भेट कधी झाली ? असा प्रश्न सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला. त्यामुळे सभागृहात एकच हशा पिकला.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!