30 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeआरोग्यढोबळी मिरची खाण्याचे फायदे जाणून घ्या!

ढोबळी मिरची खाण्याचे फायदे जाणून घ्या!

काही जण ढोबळी मिरची खाताना नाकं मुरडतात. पण यातील गुणधर्म आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. त्यात कॅलरीजचे प्रमाण कमी असते. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. याशिवाय त्यात प्रथिने, कार्बोहायड्रेट, व्हिटॅमिन ए, सी, के, पोटॅशियम आणि पायरीडॉक्सिन असतात. ज्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. आपण याचा वापर भाजी, पिझ्झावर टॉपिंग, किंवा इतर भाज्यांमध्ये मिक्स करून खाऊ शकता. लाल, हिरवी, जलपीनो ढोबळी मिरच्या दिसायला फार आकर्षक दिसतात. पण खास गोष्ट ही की तितक्याच आरोग्यदायी असतात. पोटाचे अल्सर, फ्लू, हृदयरोग, उच्च रक्तदाब, मधुमेह यांसारख्या गंभीर आजारांपासून बचाव होण्यासाठी ढोबळी मिरची अत्यंत फायदेशीर ठरते. मात्र अनेकांना ही भाजी आवडत नाही. मात्र या आरोग्यदायी फायद्यांसाठी ढोबळी मिरची अवश्य खा

काही जण ढोबळी मिरची (Dhobali chili) खाताना नाकं मुरडतात. पण यातील गुणधर्म आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. त्यात कॅलरीजचे प्रमाण कमी असते. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. याशिवाय त्यात प्रथिने, कार्बोहायड्रेट, व्हिटॅमिन ए, सी, के, पोटॅशियम आणि पायरीडॉक्सिन असतात. ज्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. आपण याचा वापर भाजी, पिझ्झावर टॉपिंग, किंवा इतर भाज्यांमध्ये मिक्स करून खाऊ शकता. लाल, हिरवी, जलपीनो ढोबळी मिरच्या दिसायला फार आकर्षक दिसतात. पण खास गोष्ट ही की तितक्याच आरोग्यदायी असतात. पोटाचे अल्सर, फ्लू, हृदयरोग, उच्च रक्तदाब, मधुमेह यांसारख्या गंभीर आजारांपासून बचाव होण्यासाठी ढोबळी मिरची (Dhobali chili) अत्यंत फायदेशीर ठरते. मात्र अनेकांना ही भाजी आवडत नाही. मात्र या आरोग्यदायी फायद्यांसाठी ढोबळी मिरची अवश्य खा…( Know the benefits of eating Dhobali chili!)

वजन कमी करण्यास मदत
ढोबळी मिरचीमुळे मेटाबोलिझम सुधारते आणि वजन कमी करण्यास मदत होते. वजन कमी करण्याच्या अनेक सप्लीमेंट्स, गोळ्यांमध्ये याचा वापर केला जातो. त्यामुळे आपल्या आहारात विविध रंगी मिरच्यांचा अवश्य समावेश करा.
रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी व्हिटॉमिन सी युक्त ढोबळी मिरचीमुळे रोगप्रतिकारकशक्ती सुधारते. फ्लू,

इंफेक्शनपासून संरक्षण होते.
अपचन आणि पोटांच्या अल्सरवर आराम , ढोबळी मिरची पोटातील हानीकारक बॅक्टेरीयांपासून वाचवण्यासाठी आणि पोटांचे अल्सर रोखण्यासाठी उपयुक्त ठरते. यामुळे पचन सुधारते आणि अपचनाचा त्रास कमी होतो.

नाकांचे त्रास दूर करण्यासाठी
ढोबळी मिरची नाकातील वायुमार्ग साफ करते आणि बंद नाकामुळे होणारा त्रास कमी करण्यास फायदेशीर ठरते.

स्मरणशक्ती सुधारण्यास साहाय्यक
अभ्यासानुसार, ढोबळी मिरची खाल्याने चाळीस वर्षांच्या वरील व्यक्तींच्या कोंग्निटिव्ह फंक्शन (cognitive function) सुधारणा होण्यास मदत होते.

अँटी इंफ्लेमेटरी गुण
ढोबळी मिरचीत अँटी इंफ्लेमेटरी गुण असतात. ज्यामुळे हृदयरोग, उच्च रक्तदाब आणि मधुमेहापासून बचाव होण्यास मदत होते

हृदय आणि डोळ्यांसाठी फायदेशीर : हिरवी शिमला मिरची खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो. कारण आहारात हिरव्या मिरचीचा समावेश केल्यास कोलेस्ट्रॉल, रक्तातील साखरेची पातळी आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते. त्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते. यासोबतच हिरव्या सिमला मिरचीमध्ये ल्युटीन नावाचा पदार्थ देखील आढळतो ज्यामुळे दृष्टी सुधारण्यास मदत होते.

पोषक तत्वांनी समृद्ध : हिरवी मिरची शिमला मिरची अनेक प्रकारच्या पोषक तत्वांनी समृद्ध आहे. यामध्ये अँटिऑक्सिडेंट्स, कार्बोहायड्रेट्स, फायबर, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, पोटॅशियम, व्हिटॅमिन बी-6, कॅलरीज आणि प्रोटीन्स चांगल्या प्रमाणात आढळतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी