29 C
Mumbai
Wednesday, July 3, 2024
Homeव्हिडीओहा Video तुफान व्हायरल झाला, Bigg Boss 13 चा विनर सिद्धार्थ शुक्लाचा...

हा Video तुफान व्हायरल झाला, Bigg Boss 13 चा विनर सिद्धार्थ शुक्लाचा शॉकिंग व्हिडीओ! लोकांनी केलं प्रचंड ट्रोल

टीम लय भारी

मुंबई : बिग बॉस 13 (Bigg Boss 13) चा विनर सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla) एका व्हिडीओमुळं (Video) जोरदार ट्रोल होताना दिसत आहे. सिद्धार्थनं अलीकडेच त्याचा 40 वाढदिवस साजरा केला आहे. बिग बॉस 13 ची एक्स स्पर्धक शहनाज गिल (Shehnaaz Kaur Gill) हिनं त्याचा वाढदिवस आणखी खास बनवला होता. तिनं मध्यरात्री त्याला बर्थडे विश केलं आणि केकही कापला.

व्हायरल होतोय सिद्धार्थचा व्हिडीओ

सध्या सोशल मीडियावर सिद्धार्थचा एक शॉकिंग व्हिडीओ समोर आला आहे. यात एका व्यक्तीनं त्याच्यावर मद्यपान करून गाजी चालवत असल्याचा आरोप केला आहे. सोबतच त्यानं एका गरिब माणसाला मारहाणही केली. व्हिडीओत सिद्धार्थ म्हणत आहे की, ज्याला त्यानं मारलं आहे तो त्याला चाकू दाखवत होता.

https://www.instagram.com/p/CIsOtQDBS3-/?utm_source=ig_embed

व्हिडीओ बनवणारा म्हणत आहे की, हा सिद्धार्थ शुक्ला आहे पिऊन गाडी चालवत आहे. यानंतर सिद्धार्थ म्हणतो की, काय करतोय रेकॉर्ड करतोय का. यावर तो माणूस म्हणतो तु्म्ही त्या गरीब माणसाला मारलं ना. यावर सिद्धार्थ म्हणतो की, तो मला चाकू दाखवत होता.

सध्या सिद्धार्थचा हा व्हिडीओ सोशलवर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. अनेकजण यावर कमेंट करत प्रतिक्रिया देताना दिसत आहे. अनेकांनी त्याला ट्रोल केलं आहे. काहींनी हा व्हिडीओ चुकीचा असल्याचंही म्हटलं आहे. काही त्याला सपोर्ट करताना दिसत आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी