30 C
Mumbai
Wednesday, April 17, 2024
Homeव्हिडीओVIDEO: मुंबई अहमदाबाद मार्गावर पाऊस!

VIDEO: मुंबई अहमदाबाद मार्गावर पाऊस!

मुंबई-अहमदाबाद हायवेवर बेमोसमी पावसाने लावली हजेरी.

महाराष्ट्रात या वेळी थंडीने चांगला जोर धरला आहे. राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये कडाक्याची थंडी पाहण्यास मिळते. पहाटेच्या सुमारास आणि मध्यरात्री थंडीचे प्रमाण सुद्धा वाढलेले दिसत होते. पण आता भर हिवाळ्या राज्यात मात्र पावसाने हजेरी लावली आहे. काही महिन्यांकरिता विश्रांती घेतलेला पाऊस आता पुन्हा सक्रीय झाला आहे. हवामान खात्याकडून महाराष्ट्राच्या अनेक जिल्हांमध्ये पावसाचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील इतर राज्यासोबतच मुंबईमध्ये ही आज पावसाचे वातावरण आहे. काल (12 डिसेंबर) रोजी मुंबई-अहमदाबाद हायवेवर सुद्धा या बेमोसमी पावसाने आपली हजेरी लावली होती. मुंबई-अहमदाबाद हायवेवरील या बेमोसमी पावसाचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओत हायवेवरील जोरदार पाऊस आणि त्यामुळे प्रवाशांचा झालेला खोळंबा दिसुन येत आहे. डोळ्यांना गारवा देणारा हा व्हिडिओ हायवेवरुन प्रवास करणाऱ्या एका कारचालकाने टिपला होता.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी