30 C
Mumbai
Wednesday, May 8, 2024
Homeक्राईमशरद पवारांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध लागला

शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध लागला

ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती.

ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. मुंबईतील सिल्हर ओक या त्यांच्या निवासस्थानी फोन करुन पवार यांना धमकी दिली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांनी तातडीने तपासकार्य हाती घेत आरोपीचा शोध लावला आहे. हा आरोपी बिहारमधील असून तो वेडसर असल्याची माहिती समोर आली आहे.

संबंधीत व्यक्तीने शरद पवार यांच्या निवासस्थानी फोन करुन त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच मी देशी बनावटीचे पिस्तूल घेऊन मुंबईत आल्याचे देखील त्याने सांगितले होते. पवार याच्या निवासस्थानी फोन आल्यानंतर सिल्हर ओक बंगल्यावर तैनात असलेल्या पोलीस ऑपरेटरने गावदेवी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर पोलिसांनी कलम 294, 506 (2) अंतर्गत गुन्हा दाखल केला. तसेच तातडीने तपास सुरू केला. पोलिसंनी फोनचे लोकेशन ट्रेस केल्यानंतर ते बिहारमधील असल्याचे समोर आले. तसेच हा धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध देखील लागल्याची माहिती समोर आली असून तो वेडसर असल्याचे सांगितले जात आहे. या व्यक्तीने याधी देखील पवार यांना धमकीचा फोन केला होता. तेव्हा देखील पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेतले होते. फोन करणाऱ्या व्यक्तीने हिंदी भाषेतून धमकी दिली होती.

हे सुद्धा वाचा
हिवाळी अधिवेशन 29 डिसेंबरपर्यंत चालणार; तीन वर्षांनंतर नागपुरात कामकाज!

रिझर्व बँकेने 13 कॉर्पोरेट बँकाना ठोठावला मोठा दंड

“भुरा”कार शरद बाविस्कर यांनी नाकारला राज्य सरकारचा वाङमय पुरस्कार; “फ्रॅक्चर्ड फ्रीडम”बाबत हुकूमशाही सरकारी मनमानीविरोधात सम्यक भूमिका!

छत्रपती शिवाजी महाराज कुणबी समाजाचे; नाना पटोले यांचे वक्तव्य

दरम्यान पोलिसांनी या फोनची गंभीर दखल घेतली असून सखोल तपास सुरू केला आहे. पोलीस य़ा व्यक्तीला आता ताब्यात घेणार असल्याची माहिती देखील सुत्रांनी दिली आहे. दरम्यान या आधी देखील शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. या आधी या व्यक्तीने शरद पवार यांना धमकी दिल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते. मात्र हा व्यक्ती वेडसर असल्याने त्यावेळी त्याला सोडून देण्यात आल्याचे देखील सुत्रांनी सांगितले. आता पुन्हा त्या व्यक्तीने पवार यांच्या निवासस्थानी फोन करुन शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी