30 C
Mumbai
Wednesday, July 3, 2024
Homeमहाराष्ट्र10 वी च्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय मागे घेणार? ; विद्यार्थाचे भविष्य...

10 वी च्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय मागे घेणार? ; विद्यार्थाचे भविष्य धोक्यात

टीम लय भारी

मुंबई :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. दहावीची परीक्षा (Exam) रद्द केल्याबद्दल उच्च न्यायालयाने राज्य सरकारला चांगलेच फटकारले. शिक्षण व्यवस्थेची चेष्टा करता का? विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत सरकार गंभीर नाही का? अशाच पद्धतीने शिक्षण सुरू राहिले तर ईश्वरानेच या राज्याला वाचवावे, असे खडे बोल उच्च न्यायालयाने राज्य सरकारला सुनावले. “मुलांची शाळा संपवणारी ही दहावीची परीक्षा एकमेव परीक्षा आहे” अशी जाणीव हायकोर्टाने करुन दिली. 10 वी च्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय मागे घेणार? विद्यार्थाचे भविष्य धोक्यात (Will the decision to cancel the 10th exam be reversed? The future of the student is in danger).

निवृत्त शिक्षक धनंजय कुलकर्णी यांची हायकोर्टात याचिका

पुण्यातले निवृत्त शिक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दहावीची परीक्षा (Exam) रद्द करण्याला आव्हान दिले. वेगवेगळ्या बोर्डांनी वेगवेगळ्या पद्धतीने दहावीचे निकाल लावले आहेत, त्यामुळे अकरावीच्या प्रवेशात अडचणी येतील, असे कुलकर्णी यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे.

आकाशातून नाही तर जमिनीवरून पाहणी करणार, मुख्यमंत्र्याचा मोदींना टोला

कोकण किनारपट्टीची पाहणी करताना मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना खोचक टोला

Second wave of Covid-19 may hit India’s economy harder, say experts

कोर्टात नेमके काय घडले?

प्रियाभूषण काकडे यांनी सरकारची बाजू मांडली. राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या सल्ल्याची वाट पाहात आहोत, त्यानंतर निकालाचा फॉर्म्युला ठरेल असे काकडे यांनी कोर्टाला सांगितले. यावर “तुम्ही काय शिक्षणव्यवस्थेची थट्टा चालवली आहे?  असे कठोर प्रत्युत्तर न्यायमूर्तींनी दिले. कोरोना साथीमुळे परीक्षा (Exam) रद्द कराव्या लागल्या असा युक्तिवाद काकडे यांनी करताच, “कोरोनाची साथ, कोरोनाची साथ काय करता?  कोरोनाच्या नावावर तुम्ही मुलांचे भविष्य आणि करीयर असे उद्ध्वस्त करु शकत नाही” असे म्हणत कोर्टाने सरकारला झापले. “राज्यात शैक्षणिक धोरणे ठरवणाऱ्यांनी हे लक्षात घ्यायला हवे. आम्हाला हे अजिबात मान्य नाही” असे ही कोर्टाने स्पष्ट सांगितले आहे.

तुम्ही शिक्षण व्यवस्थाच उद्ध्वस्त करुन टाकताय’

“बारावीच्या 14 लाख मुलांची परीक्षा (Exam) तुम्हाला घ्यायचीय, पण दहावीच्या 16  लाख मुलांची परीक्षा (Exam) घेत नाही” असे निरीक्षणही कोर्टाने नोंदवले. “निर्णय घेणाऱ्यांनी त्यांच्या लहरीपणे निर्णय घेत असल्याचे दिसते” असेही कोर्ट म्हणाले. दहावीची परीक्षा न घेण्याचा निर्णय सरकारचा धोरणात्मक निर्णय आहे असे वकील काकडे यांनी युक्तिवाद केला, त्यावर कोर्टाने “तुम्ही शिक्षण व्यवस्थाच उद्ध्वस्त करुन टाकताय” असे कोर्ट म्हणाले. पहिली ते नववी आणि अकरावीची सारी बॅच परीक्षेशिवाय पुढच्या वर्गात गेली असा युक्तिवाद कुलकर्णी यांच्या वकिलांनी कोर्टाच्या निदर्शनाला आणून दिले.

परीक्षा रद्द करण्याच्या मागणीच्या याचिकेवर हायकोर्ट काय म्हणाले?

अनुभा सहाय यांनी ही हस्तक्षेप याचिका दाखल करुन परीक्षा रद्दच कराव्या अशी मागणी केली आहे. त्यांची बाजू वकील माधवेश्वरी म्हसे यांनी मांडली. म्हसे यांनी आपल्या युक्तिवादात गुजरात, मध्यप्रदेश, तामिळनाडू या राज्यांनीही परीक्षा (Exam) रद्द केल्यात असे सांगितले. मद्रास हायकोर्टाने तर परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिकाही फेटाळून लावली, असे कोर्टाच्या निदर्शनाला आणून दिले. त्यावर न्यायमूर्ती काठावालांनी, “तो निर्णय आम्हाला बंधनकारक नाही, आम्ही देशाचे भवितव्य असलेल्या आमच्या मुलांची काळजी करणार” असे सांगितले. “आमच्या मुलांना असे वर्षानुवर्षे बढती पास करता येऊ शकत नाही” असे कोर्टाने सांगितले. “अशा निर्णयांनी आपण मुलांना मदत करत नाही तर त्यांची हानीच करतोय” असे ही कोर्ट म्हणाले.

सीबीएसई, आयसीएसई, एसएससी बोर्डाच्या वकिलांची नेमकी भूमिका काय?

सीबीएसई बोर्डाने ही परीक्षा रद्द केल्यात. मिहीर जोशी यांच्या वकिलांनीही यावेळी युक्तिवाद केला. परीक्षा रद्द करण्यापूर्वी आम्ही बोर्ड परीक्षा घेतली आणि अंतर्गत परीक्षाही (Exam) घेतली असे या वकिलांनी सांगितले. परीक्षा (Exam) रद्द केल्या असल्या तरी ज्या मुलांना जुलैमध्ये परीक्षा (Exam) द्यायचीय ते देऊ शकतात, असे ही हे वकील म्हणाले. आयसीएसई बोर्डाचे वकील प्रतीक कोठारी यांनी, आम्ही तज्ज्ञांची समिती नेमू आणि अंतर्गत मूल्यमापनावर आधारीत फॉर्म्युला बनवू असे सांगितले.

एसएससी बोर्डाचे वकील किरण गांधी यांनी, राज्य सरकारकडून परीक्षा आणि निकालासंबंधीच्या फॉर्म्युल्याची वाट बघत आहोत असे सांगितले. बोर्डांचा हा युक्तिवाद कोर्टाला पटला नाही. “तुम्ही लोकांनी काहीच तयारी केली नाही, नुसती परीक्षा (Exam) रद्द केली आणि बसून राहिलात” असे न्यायमूर्ती काठावाला उद्विग्नपणे म्हणाले.सर्वांच्या युक्तिवादांवर आधारीत कोर्ट आपले आदेश देणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी