28 C
Mumbai
Wednesday, June 26, 2024
Homeराजकीयकोऱ्या कागदांवर स्वाक्षऱ्या घेतल्याचा साक्षीदाराचा ‘एनसीबी’वर खळबळजनक आरोप

कोऱ्या कागदांवर स्वाक्षऱ्या घेतल्याचा साक्षीदाराचा ‘एनसीबी’वर खळबळजनक आरोप

टीम लय भारी

मुंबई: केंद्रीय अमलीपदार्थ नियंत्रण विभागाच्या (एनसीबी) अधिकाऱ्यांनी आपल्याला कोऱ्या कागदांवर स्वाक्षरी करण्यास भाग पाडल्याचा आरोप क्रुझवरील अमलीपदार्थ पार्टी प्रकरणातील आणखी एक पंच साक्षीदाराने विशेष न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे केला आहे(Witness accuses NCB of signing blank papers)

हे प्रतिज्ञापत्र नोंदीवर घेण्याची विनंतीही त्याने न्यायालयाला केली.

आर्यन खान प्रकरणातील NCB चा प्रत्येक अधिकारी गजाआड व्हायलाच हवा;शिवसेनेचा हल्लाबोल

अनन्या पांडेची आज तिसऱ्यांदा चौकशी होणार; NCB ने बजावले समन्स

सोनू म्हस्के असे या पंच साक्षीदाराचे नाव असून त्याने विशेष न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करत एनसीबी अधिकाऱ्यांनी बळजबरीने चार हिंदी भाषेतील, तर काही कोऱ्या कागदांवर स्वाक्षरी करण्यास दबाव आणल्याचा आरोप केला आहे.

या कामी सहकार्य केले नाही, तर खोट्या प्रकरणात गोवण्याची धमकीही आपल्याला देण्यात आल्याचा दावा म्हस्के याने केला आहे,  अचित कुमार यांच्या घरातून हस्तगत करण्यात आलेल्या अमलीपदार्थाचा म्हस्के हा पंच साक्षीदार आहे.

NCB, ED वापरून झाली असेल तर सरकार पाडण्यासाठी सैन्य बोलवा : संजय राऊत

Arbaaz Merchant’s Father Making Him Pose for Paparazzi at NCB is Making Desis Cringe

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी