33 C
Mumbai
Sunday, May 12, 2024
Homeटॉप न्यूजमहिला कॉन्स्टेबल तृप्ती मुळीकने केले उपमुख्यमंत्रीच्या गाडीचे सारथ्य

महिला कॉन्स्टेबल तृप्ती मुळीकने केले उपमुख्यमंत्रीच्या गाडीचे सारथ्य

टीम लय भारी

सिंधुदुर्ग: जिल्हा नियोजन समितीच्या नवीन सभागृहात नियोजन समितीचे कामकाज, कोविड – 19 विषाणू प्रादुर्भाव व उपाययोजना तसेच चक्रीवादळ व अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान याविषयी आढावा घेण्याकरीता (Women constable Trupti Mulik drove the ajit pawar s  car)

उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांनी  सिंधुदुर्ग दौरा केला आहे .

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावेळी त्यांच्या गाडीचे सारथ्य तृप्ती मुळीक या पोलिस दलातील महिला चालकाने केल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. तृप्ती मुळीक गेल्या दहा वर्षापासून पोलीस दलामध्ये कार्यरत असून लहानपणापासूनच त्यांना ड्रायव्हिंगची आवड आहे.

सरकार शेतकऱ्यांना दिलेले प्रत्येक आश्वासन पूर्ण करेल : अजित पवार

Breaking : अजित पवार संतापले, माझ्या संस्थांवर धाडी टाकता, पण बहिणीच्यां घरांवर धाडी कशासाठी ?

राज्यात आतापर्यंत महिला कॉन्स्टेबलने उपमुख्यमंत्री असेल किंवा मंत्र्यांच्या गाडीचे सारथ्य केल्याचे आपण पाहिले नाही. मात्र आज दिवसभर सिंधुदुर्गात मंत्र्यांचे सारथ्य करणाऱ्या तृप्ती मुळीक यांची जोरदार चर्चा झाली.

आज ओरोस येथे जिल्हा नियोजन समितीची बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडली. ते विमानतळावरून कार्यक्रमस्थळी आले तेव्हा त्यांच्या गाडीचे सारथ्य महिला पोलीसाने केले. त्यामुळे त्या भगिनीचे सर्वत्र कौतुक होत आहे. राज्यात मंत्र्यांच्या गाडीचे सारथ्य एका महिलेने केले ही पहिलीच घटना असावी. राज्य शासन नेहमीच महिलांच्या सक्षमीकरणावर भर देत आहे त्याची ही पावतीच म्हणावी लागेल.

मास्क न लावणाऱ्यांना सभागृहाबाहेर काढा : अजित पवार

Comprehensive probe will be held in TET exam manipulation: Ajit Pawar

23 डिसेंबर 2019 रोजी व्हीआयपी ड्रायव्हिंगचा कोर्स पूर्ण करून आज पहिल्यांदाच नवी जबाबदारी पार पाडली.व्हीआयपी ड्रायव्हिंग करण्याचा आजचा पहिला दिवस असला तरी तृप्ती यांनी कोणतीही भीती मनात न बाळगता आपली जबाबदारी बिनधास्तपणे पार पाडली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी