31 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeटॉप न्यूजमहिलांनी लष्करात यावे यासाठी प्रयत्न केले : शरद पवार

महिलांनी लष्करात यावे यासाठी प्रयत्न केले : शरद पवार

टीम लय भारी

सातारा: लष्करात मुली यायला पाहिजेत यासाठी प्रयत्न केल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. त्यावेळी लष्करी अधिकारी मला सांगत होता की, हे मुलींकडून होणार नाही. मी बोललो की संरक्षण मंत्री मी आहे. हा निर्णय मी करून घेतल्याचे पवार म्हणाले. रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेजच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनासाठी पवार साताऱ्यात आले होते, यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले. “महिलांनी लष्करात यावे यासाठी संरक्षण मंत्री असताना प्रयत्न केला होता, त्यावेळी लष्करातील अधिकाऱ्यांनी महिलांना हे जमणार नाही असंही सांगितलं. मात्र तरीही मी तसा निर्णय घेतला”, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं आहे.( Women tried to join army: Sharad Pawar )

साताऱ्यामध्ये एका कार्यक्रमामध्ये शरद पवार यांनी याबाबत माहिती दिली. घर पुढं नेण्यासाठी मुलींचं शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचं आहे, असंही पवार यावेळी म्हणाले. एबीपी माझानं हे वृत्त दिलं आहे.

दिल्लीत उदयनराजे भोसलेंनी घेतली शरद पवारांची भेट; तर्क-वितर्कांना उधाण!

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होईल म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांना शरद पवारांचा टोला; म्हणाले…

नव्या पिढीला शैक्षणिकदृष्टीने समृद्ध करण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेचं वैशिष्ट्ये म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी जात पात पाहिली नाही. रयतेचे राज्य म्हणून हिंदवी स्वराज्याकडे पाहिलं जातं.  सातारा जिल्हा हा स्वतंत्र चळवळीतील महत्वाचा जिल्हा आहे. आता स्वतंत्र मिळालं, आता ज्ञान मिळवणं हे गरजेचं आहे. हे भाऊराव पाटील यांनी ओळखलं होत. त्यामुळेच त्यांनी रयत शिक्षण संस्थेचं रोपटं लावलं. त्याचीच ही एक इमारत असल्याचे पवार म्हणाले.

ग्रामीण भागातील मुलं मुंबई-पुण्यात अधिकारी पदापर्यंत पोहोचतात, याचा अभिमानही पवारांनी व्यक्त केला. शेती गरजेची आहे. पण कुटुंबातील एकानं शेती करावी आणि इतरांनी संधी मिळेल तिथं काम करत नाव कमवावं असं आवाहनही त्यांनी केलं.ज्ञान आणि आत्मविश्वासातून कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळवता येतं हे पाहायला मिळालं आहे. त्याला पर्याय नसल्यामुळं ज्ञान मिळवत राहायला हवं,  मी गावभर हिंडतो, पण माझं घर मागे पत्नी सांभाळते. चार चार दिवस घराकडे जात नाही, असेही पवार यावेळी म्हणाले.

ऊसतोड कामगार महामंडळाचे कार्यालय पुणे व परळीत साकारणार, 3 कोटी रुपये निधी वितरित : धनंजय मुंडे

Sharad Pawar asks for Chandrakant Patil’s comments on President’s Rule to be ignored

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी