30 C
Mumbai
Monday, May 13, 2024
Homeमुंबईनिरुपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे दातृत्ववान नेतृत्व; महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे 25 लाख...

निरुपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे दातृत्ववान नेतृत्व; महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे 25 लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीला अर्पण

ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना आज (16 एप्रिल) राज्य सरकारचा सर्वोच्च नागरी सन्मान अर्थात ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. यावेळी या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह धर्माधिकारी कुटुंबीय उपस्थित होते. यावेळी आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी श्वास सुरू असेपर्यंच हे काम असंच सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. हा पुरस्कार वितरण सोहळा पाहण्यासाठी राज्यभरातून लाखो लोकांचा जनसमुदाय खारघरच्या मैदानात दाखल झाला होता. विशेषतः आप्पासाहेबांनी पुरस्कारासह मिळालेली 25 लाख रुपये ही रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दान केल्याची मोठी घोषणा केली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते त्यांना स्मृतीचिन्ह, शाल, मानपत्र आणि 25 लाख रुपयांचा धनादेश प्रदान करून आप्पासाहेबांना सन्मानित करण्यात आले. मात्र अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी पुरस्कारात मिळालेली मानधनाची 25 लाख रूपयांची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिली आहे. या पुरस्कारासाठी योग्य व्यक्तीची निवड ही सरकारने नियुक्त केलेल्या समितीद्वारे केली जाते. मात्र आप्पासाहेबांच्या या निर्णयाने राज्यस्तरांवरून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.

Image

या पुरस्कार सोहळ्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित होते. अमित शाह आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आप्पासाहेबांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही यावेळी उपस्थित होते. तसेच महाराष्ट्राच्या कॅबिनेटमधील अनेक मंत्री, आमदार आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या सोहळ्याला हजेरी लावली.

हे सुद्धा वाचा: 

महाराष्ट्र भूषण: डाॅ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या गौरव सोहळ्यात रणरणत्या उन्हात लाखोंचा जनसागर लोटला

निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर!

महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी आता २५ लाख रुपये; २७ नवांचा सरकारकडे प्रस्ताव नव्या नावांवर देखील विचार

Maharashtra Bhushan, Appasaheb Dharmadhikari donate 25 lakhs of the award to the Chief Minister’s Relief Fund, Dr. Appasaheb Dharmadhikari, Maharashtra Bhushan ceremony, Appasaheb Dharmadhikari, Maharashta Bhushan 2022

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी