36 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeमंत्रालयशिंदे सरकारचे म्हशीपेक्षा रेडकू मोठे !

शिंदे सरकारचे म्हशीपेक्षा रेडकू मोठे !

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा : 25 लाख रुपयांचा पुरस्कार आणि कार्यक्रमावर मात्र 14 कोटींचा खर्च; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भलेही रामदासी परंपरेतील शिष्य असतील; पण मग जनतेच्या पैशातून ही उधळपट्टी कशासाठी ? यालाच म्हणतात, "चार आण्याची कोंबडी अन् बारा आण्याचा मसाला !"

शिंदे सरकारचे म्हशीपेक्षा रेडकू मोठे अशी आज स्थिती आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा याचे अगदी ताजे उदाहरण ठरावे. 25 लाख रुपयांचा पुरस्कार आणि कार्यक्रमावर मात्र 14 कोटींचा खर्च करण्यात आला आहे. हा तर अधिकृत तरतुदीचा खर्च आहे. एकूण खर्चाची मोजदादच अवघड. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भलेही रामदासी परंपरेतील शिष्य असतील; पण मग जनतेच्या पैशातून ही उधळपट्टी कशासाठी ? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत. ग्रामीण भाषेत यालाच “म्हशीपेक्षा रेडकू मोठे” किंवा “चार आण्याची कोंबडी अन् बारा आण्याचा मसाला” असे म्हटले जाते.

महाराष्ट्र भूषण कार्यक्रमासंदर्भात शिंदे सरकारचे एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहे. राज्य सरकारच्या माहिती व जनसंपर्क संचलनालय (DGIPR) म्हणजेच माहिती खात्याकडे, प्रसिद्धी खात्याकडे पाठविले गेलले हे वित्तीय देकार नमुना पत्र आहे. या पत्रावर सही-शिक्का नाही, संस्थेचे नावही नाही. “लय भारी”ने या पत्राच्या सत्यतेची पुष्टी केली आहे. या संदर्भात माहिती खात्याशी, तसेच मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, असा खर्च करण्याबाबतचे DGIPR चे पत्र खरेच असल्याचे अधिकृतरित्या सांगण्यात आले.  महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी 13 कोटी 62 लाख 51 हजार रुपयांच्या वित्तीय देकारास मंजूरी देण्याबाबत हे पत्र आहे.

Maharashtra Bhushan Mhashipeksha Redku Mothe Shinde Sarkar DGIPR
DGIPR चे “लय भारी”ने अधिकृतरित्या पुष्टी करून घेतलेले हेच ते व्हायरल पत्र.

संस्थांकडून वित्तीय देकार स्वतंत्रपणे अधिकृत लेटरहेडवर मागविण्याबाबत हे पत्र आहे. त्यावर तारीख, नाव-शिक्का-सही  काहीही नाही. महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई-32 यांच्या नावाने पाठविले गेलेले हे पत्र व्हायरल झालेले आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत सेंट्रल पार्क, खारघर, नवी मुंबई येथे दि. 16.4.2023 रोजी महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण समारंभ कार्यक्रमाचे आयोजन/व्यवस्थापन करण्यासाठी संकल्पना सादरीकरण आणि वित्तीय देकार देण्याबाबत पत्राचा विषय आहे.


“लय भारी”ने पुष्टी केलेल्या व्हायरल पत्रातील उर्वरित तपशील असा – 

महोदय,
आपल्या दिनांक —–  रोजीच्या पत्रानुसार सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत सेंट्रल पार्क, खारघर, नवी मुंबई येथे दि. 16.4.2023 रोजी महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण समारंभ कार्यक्रमाचे आयोजन / व्यवस्थापन करण्यासाठी संकल्पना सादरीकरण आणि वित्तीय देकार देत आहोत. कार्यक्रम आयोजन / व्यवस्थापन खर्च तपशिल सर्व कामांची अंदाजित रक्कम रु. 13,62,51,000/ (कर वेगळा)
क्र.  1.
कार्यक्रम व्यवस्थापन / आयोजन करावयाचा तपशील – ई-निविदेसोबत जोडण्यात आलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण समारंभ कार्यक्रमाचे आयोजन / व्यवस्थापन Scope of Work नुसार कामे करण्यात यावीत.
याबाबत तपशील नमूद करणे गरजेचे आहे.
अंदाजित रक्कम – 13,62,51,000/ (कर वेगळा)
एकूण खर्च
एकूण रक्कम

वर नमूद केलेल्या कामांपैकी No. of Creative कमी संख्येने पूर्ण झाल्यास त्या प्रमाणात कमी रकमेचे देयके सादर करण्यास आमची तयारी आहे.
(एकूण रुपये सर्व करांसहीत —————–)
उपरोक्त दर हे सर्व काम गृहीत धरुन देण्यात आले असून निविदा सूचनेत नमूद सर्व अटी व शर्ती मान्य आहेत.

संस्थेचे नाव/सही शिक्का


हे सुद्धा वाचा/पाहा : 

 

Mhashipeksha Redku Mothe, Maharashtra Bhushan, DGIPR, Shinde Sarkar, Central Park Kharghar

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी