26 C
Mumbai
Sunday, September 29, 2024
Homeटॉप न्यूजकोरोनानंतर देशात झिका व्हायरसचा शिरकाव; केरळमध्ये पहिला रुग्ण...

कोरोनानंतर देशात झिका व्हायरसचा शिरकाव; केरळमध्ये पहिला रुग्ण…

टीम लय भारी

मुंबई :- एकीकडे देशात कोरोना अजून नियंत्रणात नसताना, ज्या राज्यात देशातील पहिला कोरोनाचा रुग्ण आढळला होता, त्याच केरळमध्ये झिका विषाणूचे १४ रुग्ण आढळून आले आहेत. 24 वर्षाची एक गर्भवती महिला ही केरळमधील झिकाची पहिली रुग्ण ठरली आहे. तर, बाकीचे 13 रुग्ण हे आरोग्य कर्मचारी आहेत (Zika virus infiltration into the country after corona The first patient in Kerala).

केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी तातडीने नियोजन सुरू केले आहे. केंद्र सरकारकडून सहा सदस्यांची टीम तातडीने केरळमध्ये पाटवण्यात आली आहे. त्याचबरोबर, कर्नाटक सरकारने या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी मार्गदर्शक तत्वेही जारी केली आहेत (The Karnataka government has also issued guidelines to curb the spread of the virus).

वर्ध्यात उदय सामंतांसमोर सेनेच्या दोन गटात हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

राणेंच्या टीकेला विनायक राऊत यांचे सडेतोड उत्तर

कसा आहे झिका विषाणू

एडीज प्रजातीच्या डासांमुळे होणार हा व्हायरल संसर्ग आहे. एडिज डासांमुळे डेंग्यू आणि चिकनगुनिया विषाणू देखील पसरतात. झिका विषाणूची लागण झालेल्या व्यक्तीचे रक्त पिल्याने डासांना विषाणूची लागण होते. त्यानंतर, ते डास इतर लोकांमध्ये विषाणू पसरवतात.  या विषाणूचा सर्वात जास्त प्रभाव हा गर्भवती महिलांवर होतो. त्यामुळे, त्या व्हायरसचा प्रभाव बळावर होतो, जन्माला आलेल्या बाळांमध्ये मायक्रोसेफॅलीचे लक्षण दिसून येते, हा एक जन्मदोष आहे, ज्यात बाळाचे डोके हे सामान्य जन्माला येणाऱ्या बाळांपेक्षा आकाराने लहान असते. जे बाळाच्या मेंदूच्या विकासात समस्या आणू शकते.

रोहित पवारांची फडणवीसांवर खोचक टीका; खोटं बोलायची जुनी सवय आहे

Coronavirus News Live Updates: Tamil Nadu extends lockdown till July 19 with further relaxations

झिका विषाणू कसा पसरतो

संसर्ग प्रामुख्याने एडीस डासांच्या संसर्गामुळे होतो. हे डास सहसा दिवसा चावतात. डासांच्या चाव्यामुळे हा संसर्ग होतो, अशा संसर्गित व्यक्तीला चावलेला डास इतर लोकांमध्ये विषाणूचा संसर्ग पसरवतो. हा संसर्ग लैंगिक संबंध आणि दूषित रक्त स्त्रोतांसारख्या इतर मध्यमाद्वारे होऊ शकतो.

लक्षणे

  • तीव्र ताप
  • डोकेदुखी
  • सांधे दुखी
  • स्नायू दुखी
  • शारीरिक अशक्तपणा
  • उलटी
  • लाल डोळे
Zika virus after corona The first patient in Kerala
झिका व्हायरस

उपचार

यावर संसर्गावर अजून कोणते विशिष्ट उपचार आले नाहीत. परंतु डॉक्टर ताप, डोकेदुखी व वरील दिसणारी लक्षणे लक्षात घेऊन यावर उपचार करत आहेत.

बचाव

  1. आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा.
  2. डास अंधार असलेल्या ठिकाणी, पाणी साचलेल्या, ओलसर ठिकाणी असतात. त्यामुळे अशा ठिकाणी जाणे टाळा, किंवा त्या ठिकाणची स्वचछता करुण घा.
  3. मच्छरदाणीचा वापर करावा.
  4. वरील लक्षणे दिसल्यास डॉक्टरांशी संपर्क करा.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी