30 C
Mumbai
Tuesday, July 2, 2024
HomeराजकीयAshok Chavan : आत्मनिर्भर भारतासाठी पंतप्रधानांनी कष्टकऱ्यांना 7500 रूपये द्यावेत

Ashok Chavan : आत्मनिर्भर भारतासाठी पंतप्रधानांनी कष्टकऱ्यांना 7500 रूपये द्यावेत

टीम लय भारी

मुंबई : आजच्या ठप्प झालेल्या अर्थव्यवस्थेत मागणी वाढवायची असेल, तर राहूल गांधी यांच्या सुचनेनुसार प्रत्येक कष्टकऱ्याच्या खात्यात ७,५०० रूपये तात्काळ जमा करावेत, अशी मागणी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण ( Ashok Chavan ) यांनी केली आहे.

पंतप्रधान नरेंद मोदी यांनी काल रात्री देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी मागणी व पुरवठा यानुसार आत्मनिर्भर भारताची संकल्पना मांडली. मोदी यांच्या या भाषणाअगोदर राहूल गांधी यांनी ट्विट केले होते. त्यानंतर अशोक चव्हाण ( Ashok Chavan ) यांनीही नव्याने ट्विट केले आहे.

‘लॉकडाऊन’मुळे रस्त्याने चालत निघालेल्या लोकांना त्यांची घरी पोचविण्याची सोय करा. या लोकांच्या खात्यात ७५०० रूपये जमा करा, असे राहूल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले होते.

गांधी यांच्या या ट्विटचा धागा पकडून अशोक चव्हाण ( Ashok Chavan ) यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे कष्टकऱ्यांच्या खात्यात ७,५०० रुपये जमा करण्याची मागणी केली आहे.

पंतप्रधानांची घोषणा पोकळ ठरू नये : बाळासाहेब थोरात

देशाची घसरलेली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. परंतु गेल्या ६ वर्षांतील घोषणांप्रमाणे ही घोषणा सुद्धा पोकळ ठरू नये अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे.

Coronavirus

राहूल गांधी यांच्या सुचनेनुसार प्रत्येक व्यक्तीच्या खात्यात ७५०० रूपये जमा करावेत. शेतकऱ्यांचा माल किमान आधारभूत किंमतीनुसार खरेदी करावा अशीही मागणी थोरात यांनी केली आहे.

मोदी यांनी चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनचे सुतोवाच करून कोविड-१९ विरोधातील केंद्राच्या अपयशाची एक प्रकारे कबुलीच दिल्याची टीकाही थोरात यांनी केली आहे.

आणखी बातम्या वाचण्यासाठी आमचे ट्विटर अकाऊंट फॉलो करा

हे सुद्धा वाचा

KhadseVsFadanvis : गोपीचंद पडळकरांची उमेदवारी, अन् एकनाथ खडसेंचा तिळपापड

MLC election- शेकडो स्पर्धक असताना राठोड यांनाच संधी मिळण्याची ही आहेत कारणे…

पीएम मोदी ने की ‘आत्मनिर्भर भारत अभियान’ की घोषणा, दिया 20 लाख करोड़ का पैकेज

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी