30 C
Mumbai
Thursday, May 23, 2024
Homeजागतिकनाशिक कलावंतानी साकारला शास्त्रीय नृत्यांचा सुंदर अविष्कार; तीनजागतिक विश्व विक्रमांची नोंद

नाशिक कलावंतानी साकारला शास्त्रीय नृत्यांचा सुंदर अविष्कार; तीनजागतिक विश्व विक्रमांची नोंद

तीनजागतिक विश्व विक्रमांची नोंद- १३तासाहुन अधिक काळ सादरीकरण,आर्ट असोसिएटसचा पुढाकार नाशिक कुठल्याही एका शास्त्रीय नृत्यापुरते सीमित न राहता भारतातील सर्व शास्त्रीय नृत्यांचा विचार करून, त्यांचा आवाका आणि त्यांची विविधता लक्षात घेऊन त्यांना कथेच्या माध्यमातून प्रस्तुत करण्याचा सुंदर अविष्कार हा कलावंतानी सादर केला. या कार्यक्रमांद्वारे तीन जागतिक विश्व विक्रमांची नोंद झाली आहे, तेरा तासाहुन अधिक काळ चाललेल्या या कार्यक्रमाद्वारे नाशिककरांना संगीतमय नृत्य कथानची एक अनोखी,अविस्मरणीय सफरच जणू घडली.

तीनजागतिक विश्व विक्रमांची  नोंद- १३तासाहुन अधिक काळ सादरीकरण,आर्ट असोसिएटसचा पुढाकार नाशिक कुठल्याही एका शास्त्रीय नृत्यापुरते सीमित न राहता भारतातील सर्व शास्त्रीय नृत्यांचा (classical dances) विचार करून, त्यांचा आवाका आणि त्यांची विविधता लक्षात घेऊन त्यांना कथेच्या माध्यमातून प्रस्तुत करण्याचा सुंदर अविष्कार हा कलावंतानी सादर केला. या कार्यक्रमांद्वारे तीन जागतिक विश्व विक्रमांची नोंद झाली आहे, तेरा तासाहुन अधिक काळ चाललेल्या या कार्यक्रमाद्वारे नाशिककरांना संगीतमय नृत्य कथानची एक अनोखी,अविस्मरणीय सफरच जणू घडली.(Nashik artistes create beautiful inventions of classical dances; All three world records)

४२ व्या जागतिक नृत्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आर्ट असोसिएटसतर्फे शंकराचार्य न्यास येथे या कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांद्वारे आपल्या प्रगल्भ पौराणिक कथांच्या साठ्यातील काही मनमोहक कथा २८ वेग वेगळ्या समूहांकडून अप्रतिमपणे सादर झाल्या. तब्बल १३ तास ३७ मिनिट चालणारा हात दैदीप्यमान सोहळा जवळपास ७००० पेक्षा जास्त लोकांनी वेगवेगळय़ा माध्यमातून आणि ५०० लोकांनी प्रत्यक्ष अनुभवला. काळजाला भिडणाऱ्या काही कथा
या सादरीकरणातील काही कथा काळजाला भिडल्या, उपस्थित प्रेक्षकांच्या आनंदाने पाणावलेल्या डोळ्यांच्या कडा आणि चेहर्‍यावर अभिमानाने फुलून आलेले स्मित हे सगळ्यांनी अनुभवले.या कार्यक्रमात पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी खास आपल्या व्यस्त कारभारातून वेळ काढून वंदे नटराज ला उपस्थिती नोंदवली. त्यांनी य़ा अनोख्या उपक्रमांबद्दल आर्ट असोसिएटेसच्या पदाधिकाऱ्यांचेच नव्हे तर आलेल्या प्रत्येक कलाकाराचे त्यांनी खूप कौतुक केले .

सहा प्रकारातील शास्त्रीय नृत्यांचा अविष्कार
काल (ता.२७) सकाळी शिव वंदनेने सुरू झालेला हा नृत्य प्रवास कथक, भरतनाट्यम, ओडिसी, कुचिपुडी, मोहिनिहट्टम् आणि हत्रिय अश्या 6 प्रकारातील शास्त्रीय नृत्यांना कलावंतांनी एका पाठोपाठ सादर करत एका वेगळ्याच उंची वर नेले .नृत्य आविष्काराची सांगता तांडव नृत्याने झाली. या नृत्य पर्वणीत सहभाग नोंदवायला महाराष्ट्रभरातून विविध गुरुकुलांमधील 404 कलाकार उपस्थित राहिले होते.

तीन विश्व विक्रमांची घोषणा आणि आनंद
एशिया बुक ऑफ रेकॉर्डस व इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस च्या वतीने सहभागी झालेल्या प्रतिनिधींनी २७ तारखेला विश्व विक्रमा जाहीर केलl. त्यासोबतच आज (ता.२८) वंडर बुक ऑफ रेकॉर्डस लंडन कडून देखिल या विक्रमाला मान्यता देण्यात आली . अजून चौथ्या पुष्टीची आर्ट असोसिएटस् वाट बघत आहे..लवकरच् ती बातमी द्यायला देखील ते उत्सुक आहेत.

आर्ट असोसिएटस च्या अमी छेडा, राधिका चावरे आणि तोरल टकले या तिघींनी त्यांच्या पाहिल्याच कार्यक्रमात यशाचे उंच शिखर गाठले .आर्ट असोसिएटेस ची टीम आणि कलाकार या सर्वांनी प्रभु श्री रामचन्द्रांच्या पद स्पर्शाने पावन झालेल्या नाशिक नगरीत हा इतिहास घडतांना पाहिला. प्रस्तुत झालेल्या संकल्पनेतून अनेक कलाकारांनी त्यांच्या लाडक्या रामाचे चरित्र देखील नृत्याच्या माध्यमातुन उभे केले. हे शिवधनुष्य पेलतांना शंकराचार्य न्यासटे आशिष कुलकर्णी, अमितभाई पटेल,आयकेआर द ट्रव्हल्स कॉन्पोनियन, फ्रावशी अकॅडमी, गार्गी बाय, पीअँन्ड जी, माय एफएम , शौनक गायधनी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. पियूष भानोसे व्हिडिओ ग्राफी आणि पार्थ कुलकर्णी फोटोग्राफी .नाशिकच्या पौराणिक इतिहासाला आज एक वेगळी परिभाषा या ६ वेगळ्या नृत्य फॉर्म च्या प्रस्तुतीतून लाभली हे मात्र नक्की.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी