31 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeनिवडणूकवंचितचा मुंबईत एल्गार मेळावा

वंचितचा मुंबईत एल्गार मेळावा

जनहितार्थ राजकीय सामाजिक आंदोलने करणाऱ्या आंदोलकांवरील गुन्हे परत घेण्यासाठी अनेक शासननिर्णय असतांना गुन्हे परत घेतले जात नसल्याने सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वात वंचित युवा आघाडीने ३ मे रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन मुंबई येथे एल्गार मेळावा आयोजित केला आहे.युवक प्रदेश अध्यक्ष डाॅ. निलेश विश्वकर्मा यांच्या अध्यक्षतेखाली हा युवा एल्गार पुकारला जाणार आहे.

महाराष्ट्रातील सामाजिक आणि राजकीय आंदोलनातील गुन्हे , खटले मागे घेण्यासाठी वंचित बहूजन युवा आघाडी एक्शन मोडवर असून राजकीय सामाजिक गुन्हे परत घेण्यासाठी पुढाकार घेतला आहे.कुठल्याही राजकीय सामाजिक आंदोलने ह्यातील सर्वच राजकीय अथवा सामाजिक कार्यकर्त्यां वरील गुन्हे परत घेण्यासाठी मोठी मोहीम सुरू करण्यासाठी राज्यस्तरीय नियोजन करण्यात आल्याची घोषणा वंचित बहुजन युवा आघाडीने केली आहे.

सार्वजनिक हिताच्या समस्यां आणि अन्याय अत्याचाराचे घटना घडल्यानंतर राजकीय, सामाजिक संघटना बंद पुकारतात, घेराव घालतात, निदर्शने करून आंदोलन केले जाते.त्यात दाखल गुन्हे मध्ये प्रामुख्याने खैरलांजी पासून ते रमाबाई आंबेडकर नगर, कोरेगाव भिमा, ३ जानेवारी बंद, मराठा क्रांती मोर्चा आणि इतर कोणत्याही आंदोलनात आंदोलकाच्या विरुद्ध दाखल केलेले गुन्हे हे राजकीय किंवा सामाजिक स्वरूपाचे असल्याने ह्या गुन्ह्यातील खटले तपासाअंती मागे घेण्याची तरतूद महाराष्ट्र सरकार गृह विभागाने वेळोवेळी काढण्यात आलेल्या अनेक शासन निर्णयात नमूद आहे.

हे सुद्धा वाचा

शेतकरी आत्महत्या बंद का होत नाहीत? त्याने रक्ताच्या थेंबाने लिहिले राज्यपालांना पत्र..!

गँगस्टरच्या मुलाला सायबर गुन्हेगारांनी लुटलं

अभिनेत्री ख्रिसन परेरा हिला अंमली पदार्थाच्या गुन्ह्यात फसवलं

 

कोरेगाव भीमा (जिल्हा पुणे) तीन जानेवारी बंद आणि मराठा क्रांती मोर्चासह अगदी आरे जंगल आंदोलन आणि कोविड काळा सहित इतर सर्व राजकीय सामाजिक आंदोलने यातील गुन्हे परत घेण्यासाठी अनेक शासन निर्णय असून सुद्धा सदर गुन्हे परत घेतले गेले नाहीत.त्यात दि.१ जानेवारी २०१८ रोजी घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने महाराष्ट्रात विविध ठिकाणी झालेल्या आंदोलनाचे गुन्हे आणि खटले परत घेणे बाबत तसेच मराठा क्रांती मोर्चा प्रकरणात देखील गुन्हे परत घेण्याची तरतूद आहे.हे गुन्हे काढून घेतांना केवळ दोन अटी घालून हे सर्व गुन्हे, खटले काढले जाऊ शकतात.ह्यासाठी वंचित युवा आघाडी राज्य पातळीवर मोहीम उभी करणार असल्याची माहिती वंचितचे उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे यांनी दिली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी