27 C
Mumbai
Sunday, September 8, 2024
Homeशिक्षणचंद्रकांतदादा, CET Cell च्या अधिकाऱ्यांच्या माजुरडेपणाचा हा घ्या पुरावा |

चंद्रकांतदादा, CET Cell च्या अधिकाऱ्यांच्या माजुरडेपणाचा हा घ्या पुरावा |

'लय भारी'चे संपादक तुषार खरात हे प्रवेश प्रक्रिया समजावून घेण्यासाठी आज दुसऱ्यांदा सीईटी सेलमध्ये गेले असता, तिथे बसवून ठेवण्यात आले. जनसंपर्क अधिकारी व कोणीच अधिकारी विद्यार्थीहिताची कोणतीच माहिती देण्यास पुढे येईनात.गोरगरीब विद्यार्थ्यांच्या पैशातून अशी उधळपट्टी केली जात आहे. याबाबतची माहिती घेण्याचाही प्रयत्न 'लय भारी'ने केला.

MHT CET : चंद्रकांतदादा तुमच्याच डोळ्याने पाहा, CET सेलचे माजुरडे अधिकारी सामान्य जनतेला किड्यामुंग्याची कशी किंमत देतात(CET Cell Officials Exposed). राज्यातील अभियांत्रिकी, आरोग्य विज्ञान, फार्मसी अशा अनेकविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशामध्ये एकसूत्रीपणा आणावा म्हणून सरकारने साधारण पाच – सहा वर्षांपूर्वी सीईटी सेलची स्थापन केली आहे. पण या सेलच्या कार्यालयात संशयास्पद कामे सुरू आहेत. या सेलचा कारभार पारदर्शक नाही. CET CELL ची प्रवेश प्रक्रिया कशी चालते. विद्यार्थ्यांना प्रवेश कसे दिले जातात. प्रवेश प्रक्रिया कधीपासून सुरू होणार याबाबतचा तपशिल जाहीर करण्याची गरज आहे. पण सीईटी सेलचा राजेशाही थाटाचा कारभार सुरू आहे. विद्यार्थी व पालकांनी सीईटी शुल्क, माहितीपुस्तके खरेदी करण्यासाठी जे पैसे भरले आहेत. त्यातून सीईटी सेलने अलिशान कार्यालय थाटले आहे. गोरगरीबांच्या या पैशातून अधिकाऱ्यांनी स्वतःची चकाचक दालने बनविली आहेत. पण समस्या घेवून येणाऱ्या विद्यार्थ्यांना व पालकांना अक्षरशः अस्पृश्यतेची वागणूक दिली जाते. त्यांना रिसेप्शनवरच ताटकळत बसवून ठेवले जाते. पत्रकार म्हणून ‘लय भारी’चे संपादक तुषार खरात हे प्रवेश प्रक्रिया समजावून घेण्यासाठी आज दुसऱ्यांदा सीईटी सेलमध्ये गेले असता, तिथे बसवून ठेवण्यात आले. जनसंपर्क अधिकारी व कोणीच अधिकारी विद्यार्थीहिताची कोणतीच माहिती देण्यास पुढे येईनात. मुळात विद्यार्थी व पालकांच्या शुल्कातून सीईटी सेलकडून भरपूर पैसा जमा झाला आहे. या पैशाची उधळपट्टी केली जात आहे. काही ठिकाणी सेंटर सुरू करण्यात आली आहेत. त्यासाठी ७० ते १०० कोटी रुपयांचे टेंडर काढण्यात आले आहे. गोरगरीब विद्यार्थ्यांच्या पैशातून अशी उधळपट्टी केली जात आहे. याबाबतची माहिती घेण्याचाही प्रयत्न ‘लय भारी’ने केला. पण त्यालाही सीईटी सेलने प्रतिसाद दिला नाही.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी