29.4 C
Mumbai
Tuesday, June 25, 2024
Homeसिनेमाअजय देवगणकडून मुंबई पालिकेला 1 कोटी; दादरमध्ये उभारणार कोव्हिड सेंटर

अजय देवगणकडून मुंबई पालिकेला 1 कोटी; दादरमध्ये उभारणार कोव्हिड सेंटर

टीम लय भारी

मुंबई :-  महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणत वाढत आहे. मुंबईमधील करोनाबाधितांची संख्या लक्षात घेत अजय देवगणने मुंबई पालिकेला 1 कोटीचा निधी दिला आहे (Ajay Devgan has given a fund of Rs. 1 crore to Mumbai Municipal Corporation).

मुंबईमधील करोनाबाधितांची संख्या लक्षात घेत मुंबई माहनगरपालिकेने शिवाजी पार्क येथील भारत स्काऊट आणि गाईड हॉलचे २० बेड्सच्या आयसीयु रुग्णालयात रुपांतर केले आहे. या रुग्णालयामधील पॅरामॉनिटर्स, व्हेंटिलेटर्स आणि ऑक्सिजन सपोर्ट सिस्टीमसाठी अभिनेता अजय देवगणने मदत केली आहे. अजयने त्याच्या मित्रांसोबत मिळून एक कोटी रुपयांचा निधी या कामासाठी मुंबई महानगरपालिकेला दिला आहे (Ajay, along with his friends, has donated Rs 1 crore to the Mumbai Municipal Corporation for this work).

महापालिकेच्या बिझनेस डेव्हलपमेंट सेलकडे अजयच्या एनव्हाय फाऊण्डेशनकडून एक कोटी रुपये देण्यात आले आहेत (One crore rupees has been donated by Ajay Envoy Foundation). हा निधी मिळाल्यानंतरच महानगरपालिकेने या ठिकाणी ऑक्सिजन बेड्सची व्यवस्था असणारे सेंटर उभे करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु केले आहे.

जयंत पाटील यांच्या चिरंजिवांचा कौतुकास्पद निर्णय

“हिंदुजा रुग्णालयामध्ये रुग्णसंख्या वाढल्याने तेथील उपलब्ध सुविधांवर ताण निर्माण झालेला. तसेच स्थानिकांनाही आयसीयु बेड्सची गरज होती. अजय देवगणने बीएमसीला केलेली मदत फार मोलाची आहे (Ajay Devgn help to BMC is invaluable). या नव्या कोव्हिड सेंटरमुळे इतर मोठ्या रुग्णालयांवरील ताण कमी होईल. येथे येणाऱ्या रुग्णांना चांगले उपचार देण्याला आमचे प्राधान्य राहिले. विशेष म्हणजे हे कोव्हिड सेंटर चालवण्यासाठी मदत करायला हिंदुजा रुग्णालयाने पुढाकार घेतला आहे.

सध्या सर्वांनाच आयसीयुची गरज असल्याने याचा नक्कीच फायदा होईल,” असे स्थानिक नगरसेविका असणाऱ्या विशाखा राऊत यांनी एका वृत्तसंस्थाशी बोलताना सांगितले. सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या केंद्राचा संपूर्ण कारभार माहीमच्या पी. डी. हिंदुजा रुग्णालयाच्या व्यवस्थापनाकडून पाहिला जाणार आहे.

मोदी सरकारच्या फाजिलपणामुळे ऑक्सिजन तुटवडा, पृथ्वीराज चव्हाणांनी डागली तोफ

हिंदुजाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी असणाऱ्या जॉय चक्रवर्ती यांनी दिलेल्या माहितीनुसार, “हिंदुजा रुग्णालय या २० बेड्सच्या केंद्राचे व्यवस्थापन पाहणार आहे. हे केंद्र म्हणजे हिंदुजाचेच एक्सटेन्शन असेल. येथील रुग्णांना जेवण, उपचार, औषधे सर्व काही पुरवले जाईल. येथील डॉक्टर्स आणि नर्स ही हिंदुजाचेच असतील.

राज्य सरकारने निर्धारित करुन दिलेल्या दरांप्रमाणे रुग्णांकडून पैसे घेतले जातील. हे उपचार परवडणारे असतील. बीएमसीला या कामात सहकार्य करत असल्याचे आम्हाला समाधान आहे,” असे सांगितले.

Covid-19 crisis: India urgently needs a nationwide shelter-at-home directive – but a humane one

नगरसेविका राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी दादर पश्चिमेतील रुग्णांवर तसेच माहीम आणि आजूबाजूच्या परिसरातील रुग्णांवर उपचार केले जातील. अजय देवणग याने निधी गोळा करण्यासाठी पुढाकार घेतला (Ajay Devang took the initiative to raise funds) असला तरी बोनी कपूर, आनंद पंडित यासारख्या व्यक्तींनीही या निधीमध्ये योगदान दिल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले आहे.

मागील वर्षी मे महिन्यामध्ये अजय देवगणने बीएमसीला धारावीमध्ये पहिले रुग्णालय उभारण्यास मदत केली होती (In May last year, Ajay Devgn had helped BMC set up its first hospital in Dharavi). धारावीच्या मध्यभागी असणारे हे रुग्णालय ४००० स्वेअर मीटर जमीनीवर उभारण्यात आले आहे, एमएमआरडीच्या माहिम नॅचरल पार्कसाठी नियोजित पार्किंगच्या जागेवर हे उभे करण्यात आले आहे.

विश्र्वसार्ह बातम्यांसाठी ‘लय भारी’ चॅनेला सबस्क्राईब करा.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी