लय भारी न्यूज नेटवर्क
मुंबई : युती सरकार राज्यात असताना आम्ही एका रुपयात झुणका भाकर योजना सुरू केली होती. आता आमचे सरकार सत्तेवर आल्यास दहा रुपयांत जेवणाची थाळी उपलब्ध करून देवू असे आश्वासन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. पक्षाच्या दसरा मेळाव्यात त्यांनी ही घोषणा केली आहे.
ते पुढे म्हणाले की, आम्ही सत्तेत होतो. सत्तेत आहोत. सत्तेत राहणार. शेतकऱ्यांना कर्जमाफी नव्हे, तर कर्जमुक्त करणार. झुणका भाकर प्रमाणे 10 रुपयांत जेवणाची थाळी देणार. 300 युनीटपर्यंत विजदर 30 टक्क्यांनी कमी करणार. मधुमेह, हृदयरोग अशा आजारांवर प्राथमिक आरोग्य केंद्रात 1 रुपयांत उपचार करणार. ग्रामीण विद्यार्थ्यांना मोफत बससेवा देणार. सत्तेत आमचे सरकार आले तर या योजना निश्चितपणे राबविणार असल्याचे सांगायलाही ते विसरले नाहीत.