29 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्रमी कुठेच म्हणालो नाही मला 'जाणता राजा' म्हणा : शरद पवार

मी कुठेच म्हणालो नाही मला ‘जाणता राजा’ म्हणा : शरद पवार

लयभारी न्यूज नेटवर्क

सातारा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केल्याने वाद सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या जाणता राजा या उपाधीवरून भाजपा नेते, उदयनराजे भोसले यांनी आक्षेप घेतला. शरद पवार यांनी उदयनराजे यांच्या आक्षेपाला जोरदार प्रतिउत्तर दिले. मी कुठेच म्हणालो नाही की मला जाणता राजा म्हणा असं त्यांनी स्पष्ट केलं.

शरद पवार म्हणाले छत्रपती ही शिवाजी महाराजांची खरी उपाधी आहे. “मी कुठेच म्हणालो नाही की मला जाणता राजा म्हणा. जाणता राजा हा शब्द रामदास स्वामींनी आणला. रामदास स्वामी शिवरायांचे गुरु नव्हते. राजमाता जिजाऊ या त्यांच्या गुरु होत्या. शिवाजी महाराजांचे गुरु रामदास स्वामी होते ही लेखणीची कमाल आहे. छत्रपती ही शिवाजी महाराजांची खरी उपाधी आहे,” असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. खटाव- माण साखर कारखान्याच्या एका कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. यावेळी त्यांनी उदयनराजेंच्या टीकेला उत्तर दिलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केल्याने वाद निर्माण झाला असताना यावर प्रतिक्रिया देताना उदयनराजे भोसले यांनी शरद पवारांचा जाणता राजा असा होणारा उल्लेखही आक्षेपार्ह असल्याचं म्हटलं होतं. त्यांच्या आधी भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनीदेखील याच मुद्द्यावरुन शरद पवार यांच्यावर टीका केली होती. मात्र, आज के शिवाजी नरेंद्र मोदी हा वाद सुरु असताना उदयनराजेंनी नवा वाद सुरु केला. त्यामुळे त्यांना आज शरद पवार आणि संजय राऊत यांना टोला लगावला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी