31 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्रउदयनराजेंनी शिवरायांच्या वंशज असल्याचे पुरावे आणावेत; राऊतांनी डिवचले

उदयनराजेंनी शिवरायांच्या वंशज असल्याचे पुरावे आणावेत; राऊतांनी डिवचले

लयभारी न्यूज नेटवर्क

मुंबई : जय भगवान गोयल यांच्या ‘आज के शिवाजी- नरेंद्र मोदी या पुस्तकावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपात गेलेल्या शिवरायांच्या वंशाजांची काय भूमिका आहे असा सवाल उपस्थितीत केला होता. त्यानंतर उदनयराजेंनी शिवसेनेतील ‘शिव’ शब्द काढून टाका असा सवाल उपस्थित केला होता. आज बुधवार ( १५ जानेवारी ) राऊत यांनी पुन्हा उदयनराजेंना डिवचले. उदयनराजेंनी शिवरायांचे वंशज असल्याचे पुरावे आणावेत असा टोला लगावला आहे. यामुळे उदनयराजे विरुध्द शिवसेना संघर्ष वाढण्याची चिन्हे आहेत.

उदयनराजेंनी शिवरायांच्या वंशज असल्याचे पुरावे आणावेत; राऊतांनी डिवचले
जाहिरात

उदयनराजे भोसले यांनी मंगळवारी (१४ जानेवारी ) रोजी पत्रकार परिषदेत शिवसेनेवर जोरदार टीका केली होती. याला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपा नेते उदयनराजे भोसले यांच्या टीकेला उत्तर देताना उदयनराजेंनी शिवरायांचे वंशज असल्याचे पुरावे आणावेत असा टोला लगावला होता. उदयनराजे यांनी शिवसेनेवर टीका करताना त्यांनी पक्षातून ‘शिव’ शब्द काढून ठाकरेसेना असं नाव करावं असा टोला लगावला होता. शिवसेनेकडून शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला होता. संजय राऊत यांनी उदयनराजे यांच्या टीकेला आज बुधवारी उत्तर दिलं आहे.

महाराजांचं नाव जिथे येतं तिथे आम्ही नतमस्तक होतो…

“उदयनराजे काय बोलतात हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांना बोलण्याचा अधिकार आहे. ते भाजपाचे माजी खासदार आहेत. ते विरोधी पक्षाची भूमिका मांडतात. त्यांनी आपण शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे आणावेत. गणपती, विष्णूची पूजा करताना वंशज असावं लागत नाही,” असं संजय राऊत यांनी सांगितलं. “आम्ही सातारा, कोल्हापूरमधील गादीचा आदर करतो. महाराजांचं नाव जिथे येतं तिथे आम्ही नतमस्तक होतो. शिवाजी महाराजांच्या नावाने बाळासाहेबांनी एकजुटीचं काम पुढे नेलं, असंही यावेळी ते म्हणाले. मात्र, शिवसेना आणि उदयनराजे भोसले यांच्यामध्ये संघर्ष वाढण्याची चिन्हे असून आता संजय राऊतांच्या प्रश्नाला उदनराजे भोसले काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी