29 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रडॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची उभारणी धनंजय मुंडेच्या निगराणीखाली होणार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची उभारणी धनंजय मुंडेच्या निगराणीखाली होणार

टीम लय भारी

मुंबई :

जे काही करायचे ते उत्तमच. हाती मिळालेल्या जबाबदारीमध्ये कार्यक्षमता, गुणवत्ता दिसलीच पाहीजे अशी ख्याती धनंजय मुंडे यांची आहे. खमका नेता, धडाडीने कामे पूर्ण करण्याची क्षमता आणि दिमतीला असलेल्या कार्यक्षम अधिकारी व कर्मचाऱ्यांची फौज अशीही धनंजय मुंडे यांची प्रतिमा आहे. कामाचा प्रचंड उरक असलेल्या धनंजय मुंडे यांच्या निगराणीखाली इंदू मिल येथील प्रस्तावित डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकाची उभारणी होणार आहे. त्यामुळे डॉ. आंबेडकरांचे भविष्यातील स्मारक स्मारक डोळे दिपावणारेच असू शकेल अशी चर्चा आता मंत्रालयामध्ये सुरू झाली आहे.

मुंबईच्या इंदू मिल जागेवर बांधण्यात येणा-या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या सनियंत्रणाची महत्वपूर्ण जबाबदारी धनंजय मुंडे यांच्या सामाजिक न्याय खात्याकडे देण्यात आली आहे. काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय होऊन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी याबाबतची माहिती माध्यमांना दिली.

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची उभारणी धनंजय मुंडेच्या निगराणीखाली होणार
जाहिरात

इंदू मिल येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेबांच्या स्मारकाच्या कामाचा आढावा मंत्रिमंडळाने घेतला. त्यानंतर उपमुख्यमंत्री माध्यमांना माहिती देत होते. इंदू मिल येथील स्मारकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची वाढविण्यास मान्यता देण्यात आली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील स्मारकामधील पुतळ्याची उंची ३५० फूट इतकी करण्याचा निर्णय झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यापूर्वी या पुतळ्याची उंची २५० फूट इतकी निश्चित करण्यात आली होती. नव्या निर्णयामुळे या स्मारकाचा चबुतरा १०० फूट व पुतळा ३५० फूट अशी स्मारकाची एकूण उंची जमिनीपासून ४५० फूट इतकी होणार आहे.

या मंत्रिमंडळ बैठकीत स्मारकाच्या सुधारित संकल्पनेचे सादरीकरण सल्लागार शशी प्रभू यांनी केले. या प्रकल्पासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने सुधारित संकल्पानुसार सादर केलेल्या अंदाजित खर्चास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. हा खर्च प्राधिकरणामार्फत करण्यात येणार असून त्याची प्रतिपूर्ती शासन करणार आहे. हा प्रकल्प तीन वर्षात होणे अपेक्षित आहे. पुतळ्याची उंची वाढविण्याच्या निर्णयामुळे आवश्यक त्या परवानग्या तात्काळ घेण्यात याव्यात असे देखील मंत्रिमंडळ बैठकीत निर्देश देण्यात आले.

पुतळ्याची उंची वाढल्यामुळे यासाठी लागणारे ब्राँझचे व लोखंडाचे प्रमाण वाढेल तसेच पुतळ्याच्या पायाची देखील वाढ होईल. या स्मारकामध्ये बौद्ध वास्तुरचना शैलीतील घुमट, संग्रहालय व प्रदर्शन भरविण्याची सोय असेल. तसेच पादपीठामध्ये ६ मीटर रुंदीचे चक्राकार मार्ग असतील. या स्मारकामध्ये ६८ टक्के जागेत खुली हरित जागा असेल. या ठिकाणी ४०० लोकांची आसनक्षमता असलेले व्याख्यान वर्ग व कार्यशाळा घेण्याची सोय असलेले ध्यानगृह असेल. तसेच १००० लोकांची आसनक्षमता असलेले अत्याधुनिक प्रेक्षागृह असेल.

राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहेबांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं भव्य स्मारक इंदू मिल येथे करण्याबाबतचा निर्णय आघाडी सरकारनेच पूर्वी घेतला होता. परंतु गेल्या पाच वर्षात भाजप सरकारच्या कार्यकाळात या कामाला गती मिळू शकली नाही.

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या कामात आपला सहभाग असावा, अशा प्रकारची इच्छा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे व्यक्त केली होती.

आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी इंदू मिल येथील बाबासाहेबांच्या स्मारकाची जबाबदारी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सोपवली आहे. एमएमआरडीएही नोडल एजन्सी म्हणून काम करणार असली तरी या आंतरराष्ट्रीय स्मारकाचे काम जलद गतीने पूर्ण होण्यासाठी कामाच्या प्रतिपूर्तीची व सनियंत्रकाची जबाबदारी धनंजय मुंडे यांच्या सामाजिक न्याय विभागाकडे सोपवण्यात आली आहे.

मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानंतर “महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या प्रकल्पाची जबाबदारी मंत्रिमंडळाने सोपवल्याबद्दल मी मुख्यमंत्री श्री.उद्धवजी ठाकरे आणि उप मुख्यमंत्री श्री.अजित दादा पवार यांचा मनापासून आभारी आहे, अशी प्रतिक्रिया श्री.मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

हे सुद्धा वाचा

VIDEO : तळागाळातील रूग्णांसाठी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा धडाकेबाज निर्णय

Video : महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर डागली तोफ !

वाडियाचा वाद सोडविण्यात अजितदादा, राजेश टोपे यांचेही योगदान

अजितदादांनी मनुकुमार श्रीवास्तव यांचे केले तोंड भरून कौतुक; जिल्हाधिकारी, प्रांताधिकाऱ्यांकडून केली ‘ही’ अपेक्षा व्यक्त

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी