29 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeमुंबईवाडियाचा वाद सोडविण्यात अजितदादा, राजेश टोपे यांचेही योगदान

वाडियाचा वाद सोडविण्यात अजितदादा, राजेश टोपे यांचेही योगदान

टीम लय भारी

मुंबई : अनुदान रखडल्यामुळे वाडिया मॅटर्नीटी रुग्णालयाने रूग्णसेवा स्थगिती करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे चांगलेच वादंग माजले होते. परिणामी मुंबई महापालिकेने तातडीने २२ कोटी रुपये रूग्णालयाला देण्याचा निर्णय घेतला. या रूग्णालयात राज्य सरकारचीही भागीदारी आहे. त्यामुळे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही बाब वित्त मंत्री असलेल्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करून राज्य सरकारच्या तिजोरीतून २४ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीच ही माहिती ‘लय भारी’शी बोलताना दिली.

वाडियाचा वाद सोडविण्यात अजितदादा, राजेश टोपे यांचेही योगदान
जाहिरात

सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यासंदर्भात बैठक घेतली होती. बैठकीत वाडिया रुग्णालयाला आरोग्य विभागामार्फत 24 कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार टोपे यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना अनुदान वितरित करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले होते. विभागाने सादर केलेल्या प्रस्तावाला मंगळवारी वित्त विभागाने मान्यता दिली. त्यानुसार मंगळावरी सायंकाळी वित्त विभागाने त्याबाबतचे आदेश निर्गमित केले आहेत.

हे सुद्धा वाचा

अजितदादांनी मनुकुमार श्रीवास्तव यांचे केले तोंड भरून कौतुक; जिल्हाधिकारी, प्रांताधिकाऱ्यांकडून केली ‘ही’ अपेक्षा व्यक्त

Video : महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर डागली तोफ !

Super EXCLUSIVE : मंत्र्यांची कार्यालये, बंगल्यांवर करोडोंची उधळपट्टी; देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यासाठीही कोटीचा चुराडा

अनिल देशमुखांच्या दिमतीला आर. आर. आबांचा शिलेदार

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी