30 C
Mumbai
Tuesday, June 18, 2024
Homeएज्युकेशनआदित्य ठाकरेंच्या पावलावर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाडांचेही पाऊल

आदित्य ठाकरेंच्या पावलावर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाडांचेही पाऊल

टीम लय भारी

मुंबई : राज्याच्या मंत्रीमंडळातील तरूण चेहरा म्हणून आदित्य ठाकरे यांची ओळख आहे. मंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी कल्पक व जनहितासाठी धडक निर्णय घेण्याचा सपाटा लावला आहे. मंत्रीपदावर येण्यापूर्वी सुद्धा त्यांच्या सुचनेनुसार मुंबई महानगरपालिकेमध्ये काही स्तुत्य निर्णय घेतले गेले आहेत. यातील एका निर्णयाचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी अनुकरण केले आहे.

आदित्य ठाकरे यांच्या सुचनेनुसार मुंबई महापालिकेने सीबीएसई व आयसीएसई बोर्डाच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आता राज्य सरकारमार्फत सुद्धा सीबीएसई व आयसीएसई बोर्डाच्या शाळा सुरू करण्यात येणार आहेत. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी त्या अनुषंगाने हालचाली सुरू केल्या आहेत.

पालकांमध्ये इंग्रजी माध्यमाच्या तसेच सीबीएसई व आयसीएसई बोर्डांच्या शाळांबद्दल आकर्षण निर्माण झाले आहे. त्यामुळे राज्य शिक्षण मंडळामार्फत चालविण्यात येत असलेल्या मराठी माध्यमांच्या शाळांना घरघर लागली आहे. मराठी माध्यमांतील विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस घसरत चालली आहे. त्यामुळे शाळा टिकवणे कठीण बनले आहे. मुंबई महानगरपालिका व राज्य सरकारच्या शाळांनाही याचा फटका बसला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेमार्फत येत्या शैक्षणिक वर्षापासून सीबीएसई व आयसीएसई बोर्डाची प्रत्येकी एक शाळा सुरू होणार आहे. आता राज्य सरकारने सुद्धा त्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत.

आदित्य ठाकरेंच्या पावलावर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाडांचेही पाऊल
मुंबई महानगरपालिकेमार्फत सुरू करण्यात येणाऱ्या सीबीएसई, आयसीएसई शाळांसाठी बनविण्यात आलेल्या बोधचिन्हाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

सीबीएसई, आयसीएसई बोर्डांच्या शाळांबद्दल पालकांमध्ये आकर्षण आहे. परंतु या शाळांचे शैक्षणिक शुल्क महागडे आहे. सामान्य पालकांना हे शुल्क परवडत नाही. महानगरपालिका व राज्य सरकारने प्रस्तावित केलेल्या शाळांचे शुल्क पालकांच्या आवाख्यात असू शकेल, असे बोलले जात आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या सीबीएसई, आयसीएसई शाळांचे बोधचिन्ह जाहीर

मुंबई महानगरपालिकेमार्फत येत्या शैक्षणिक वर्षापासून सीबीएसई व आयसीएसई बोर्डाची शाळा सुरू होणार आहे. ‘मुंबई पब्लिक स्कूल’ नावाने सुरू केलेल्या या दोन्ही शाळांसाठीचे बोधचिन्ह तयार करण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत या बोधचिन्हाचे नुकतेच अनावरण करण्यात आले. ज्ञान, उत्कृष्टता, परिश्रम, प्रगती, समानता अशा अनेकविध कंगोरे ध्यानी घेऊन हे बोधचिन्ह बनविले असल्याचे महापालिकेच्या शिक्षण समितीचे सदस्य साईनाथ दुर्गे यांनी ‘लय भारी’शी बोलताना सांगितले. या शाळा सुरू करण्यासाठी दुर्गे यांनी पाठपुरावा केला होता.

आदित्य ठाकरेंच्या पावलावर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाडांचेही पाऊल
महापालिकेच्या सीबीएसई, आयसीएसई शाळांचे बोधचिन्ह
आदित्य ठाकरेंच्या पावलावर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाडांचेही पाऊल
बोधचिन्हाचा अर्थ

हे सुद्धा वाचा

आदित्य ठाकरेंचा आणखी एक कल्पक उपक्रम; यंदापासून महापालिकेमार्फत सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या शाळा सुरू होणार

आदित्य ठाकरेंच्या अभ्यासू मार्गदर्शनावर आयएएस अधिकारीही झाले चकीत

आदित्य ठाकरे जे बोलले, ते त्यांनी करून दाखवले

आदित्य ठाकरेंचा भन्नाट उपक्रम, जपानच्या सहकार्याने राज्यातील शेतकऱ्यांसाठी राबविणार ‘ही’ योजना

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी